Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

घरगुती कौटूंबिक प्रॉपट्री वाद चालू असल्याने वादातून आत्महत्या करणाऱ्याचे मुंढवा पोलिसांनी वाचवले प्राण,apcs in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मुंढवा पोलीस ठाणे बिट मार्शलचे तत्परतेमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचविण्यात.मुंढवा पोलिसांना यश, घरगुती कौटुंबिक वादातून होत असलेल्या त्रासामुळे एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंढवा पोलिसांना वेळीच याची माहिती समजल्याने पोलिसांनी युवकाचे मन परिवर्तन करुन त्याचे प्राण वाचवले. हा प्रकार मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी येथील कवडे रोड येथे रविवारी (दि.21) रात्री दहाच्या सुमारास घडला.विजय भाऊ पासलकर (वय-36) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे,

मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील घोरपडी बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार प्रविण होळकर व जगदीश महानवर यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून डायल-११२ द्वारे रात्रौ १०.०० वा. दरम्यान निगडेनगर, लेन-७, फ्लॅट नं. २८, बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे येथे कॉलर विजय भाऊ पासलकर वय ३६ वर्षे हे आत्महत्या करीत असल्याचा पोलीस मदतीचा कॉल प्राप्त झाला. तात्काळ घोरपडी बिट मार्शल अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून आत्महत्या करीत असलेल्या विजय पासलकर यास ताब्यात घेवून घोरपडी पोलीस चौकीस घेवून आले, चौकी अंमलदार सहा. पोलीस फौजदार रासकर यांनी त्यास आधार देवून, समजावून सांगून शांत केले.

कॉलर विजय पासलकर याचेकडे आत्महत्या करण्याचे कारणचे अनुषंगाने विचारपुस केली असता, घरगुती कौटूंबिक प्रॉपट्री वाद चालू असल्याने मला खुप त्रास होत आहे म्हणून मला आत्महत्या करणे सोडून दुसरा पर्याय नाही असे सांगितले. सदर कॉलची माहिती पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉलर विजय पासलकर याचे नातेवाईकांना संपर्क करुन पोलीस चौकीस बोलावून त्यांचे वाद-विवादाचे अनुषंगाने चर्चा करुन कॉलर यांचे तक्रारीचे निरासन करणे बाबत सांगितले असता, त्याप्रमाणे विजय पासलकर यांचे नातेवाईकास संपर्क करुन त्यांना सदर बाबत माहिती देवून समजावून सांगितले, तेव्हा कॉलर विजय पासलकर यांचे समाधान झाले. कॉलर यांचे आत्महत्येपासून मन परिवर्तन झाल्याने आत्महत्या करणार असल्याचे सांगुन तसा स्वःखुशीने जबाब लिहून दिला आहे.

कॉलर विजय पासलकर यास तत्परतेने वेळेत पोलीस मदत करुन योग्य सहकार्य व समुपदेशन केल्याने कॉलर यांचे आत्महत्या करण्यापासुन मन परिवर्तन केले. पोलीसांनी दाखविलेली तत्परता व मानुसकीचे नागरिकांकडून मोठया प्रमाणात कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांचे सुचनाप्रमाणे सहा. पोलीस फौजदार, रासकर, पोलीस अंमलदार प्रविण होळकर, जगदीश महानवर यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *