Crime NewsPolice News

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पकडले.


ACS POLICE CRIME SQUAD

( पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय )

वाकड पोलीस स्टेशन ची तपास पथकाची हद्दीत पेट्रोलींग करत असताना चांगली कामगिरी.

१६/१२/२०२१ पोलीस स्टेशन वाकड वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पकडले.

मा . श्री . कृष्ण प्रकाश सो , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी वाहनचोरी , घरफोडी , शरीराविरुध्द गुन्हे करणारे , सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत सुचना दिल्या त्या अनुषंगाने डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सपोनि श्री संतोष पाटील , अभीजीत जाधव , पोउनि गणेश तोरगल व तपास पथक यांना रेकॉर्डवरील मालाविरुध्द , शरीराविरुध्द गुन्हे करणा – या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांना चेक करुन गुन्हे प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या .

त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील सपोनि श्री . संतोष पाटील विजय गंभीरे , विक्रम कुदळ , प्रमोद कदम असे वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार प्रमोद कदम यांना बातमी मिळाली कि , हॉटेल अतिथी समोर , बारणे कॉर्नर , प्रसुधान सोसायटी रोड , थेरगाव पुणे येथे एक पांढऱ्या रंगाचे टी – शर्ट त्यावर CALVIN असे लिहलेले व काळे रंगांची जिन्स पॅन्ट घातलेला व दाढी असलेला अशा वर्णनाचा एक इसम थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टलसारखे हत्यार आहे .

सदर बातमीच्या अनुषंगाने समीर रफीक अन्सारी वय २६ वर्षे रा . उमेश टेकाळे यांचे घराचे मागे , गणेश मंदिर जवळ , बोरडे नगर , थेरगाव , पुणे यास सापळा रचुन शिताफीने पकडुन त्याचेकडुन एक लोखंडी गावठी पिस्टल व त्यामध्ये एक काडतुस मिळुन आले आहे

त्याचेविरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १०६०/२०२१ आर्म अॅक्ट ३ ( २५ ) . महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) , ( ३ ) १३५ , प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीस दिनांक १५ / १२ / २०२१ रोजी २०:२८ वा अटक करण्यात आले आहे . अटक आरोपीस दिनांक १६ / १२ / २०२१ रोजी मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो , कोर्ट नं . ०९ यांचेसमक्ष हजर करुन आरोपीची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आली आहे . पोलीस कोठडीत आरोपीकडे अधिक तपास करीत आहोत .

अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर गुन्हे दाखल आहेत .

सदरची कारवाई मा . श्री कृष्ण प्रकाश सो . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . संजय शिंदे , सो . अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा.श्री . आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत डिसले सो . सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पोलीस ठाणे , श्री संतोष पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सपोनि संतोष पाटील , पोलीस अंमलदार विजय गंभीरे , विक्रम कुदळ , प्रमोद कदम , कल्पेश पाटील यांनी मिळुन केली आहे .

(आनंद भोईटे) पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २. पिंपरी चिंचवड.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *