मोबाईल टॉवरचे एकूण ९६ बॅट – या चोरी करणार आरोपीला वाकड तपास पथका ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

१६/१२/२०२१ पोलीस स्टेशन वाकड मोबाईल टॉवर कंपनीच्या बॅट या चोरीत कंपनीतील कामगारच निघाले चोरटे तीन आरोपी अटक बॅटरी चोरीचे एकुण ०२ गुन्हे उघड ( वाकड तपास पथकाची कारवाई ).

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची अंमलदार वंदू गिरे, व काळे , पोना . अतिक शेख ची चांगली कामगिरी.

वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन मोबाईल टॉवरचे एकूण ९६ बॅट – या चोरी गेलेबाबत वाकड पोलीस स्टेशन गु.रजि . नं . ९८२ / २०२१ भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता मोबाईल टॉवरचे बॅट – या चोरी होणे ही गंभीर बाब असल्याने , घटनेचे गाभीय ओळखून डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि . संतोष पाटील , सपोनि जाधव , पोउपनि गणेश तोरगल यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करणे बाबत आदेशीत केले . त्याप्रमाणे सपोनि . संतोष पाटील , सपोनि . अभिजीत जाधव यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील दोन वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत त्यांना योग्य त्या सुचना दिल्या . गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोउपनि , गणेश तोरगल यांनी तपासी अंमलदार वंदू गिरे, व काळे , पोना . अतिक शेख यांचे सोबत घटनास्थळाची पाहणी केली . सदरचे टॉवर प्रताप टेक्नोक्रॅटस प्रायव्हेट लि .कंपनी.सहा.पो.फो.राजेंद्र यांचे असल्याचे माहिती प्राप्त झाली . त्यामुळे प्रताप टेक्नोक्रेटस प्रायव्हेट लि . कंपनीमध्ये सध्या कामावर असलेले व यापूर्वी काम करून सोडुन गेलेले कर्मचारी यांची यादी तयार करुन त्यांचे मोबाईल नंबर हस्तगत केले . गुन्हे प्रकटीकरण विभागातील तांत्रीक विश्लेषण करणारे पोकॉ . कौतेय खराडे यांनी सर्व मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून अभ्यास केला . त्यातुन संशयीत ईसम नामे

https://youtube.com/shorts/_zuQ9B3SjZ8?feature=share

उदय बाळासाहेब काळे वय ३० वर्षे रा . राधाकुंज निवास , सावतामाळी कार्यालयाचे मागे ज्ञानेश्वर नगर तळेगाव ढमढेरे ता . शिरुर जि.पुणे

याची ओळख पटली . त्याबाबत माहिती घेत असतांना उदय बाळासाहेब काळे याचेवर यापूर्वी शिक्रापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. ७७३/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली . त्यानंतर लागलीच सहा .पो.फो.राजेंद्र काळे , पोना.वंदू गिरे यांनी तळेगाव ढमढेरे येथे जावून उदय काळे यास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली . गुन्हयाचे तपासात उदय काळे याने सदरचा गुन्हा सध्या टॉवर प्रताप टेक्नोक्रेटस प्रायव्हेट लि . कंपनी मध्ये टेक्नीशन या पदावर कार्यरत असणा –

या राहुल मल्हारी बालघरे याचे सोबत केले असल्याचे निष्पन्न झाले . त्यामूळे राहुल मल्हारी बालघरे वय २८ वर्षे रा . गणेश मंगल कार्यालयाजवळ , कवडेनगर , नवी सांगवी मुळ राहणार मु.पो. आडे ता . मावळ , जि . पुणे यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे .

गुन्हयातील अटक दोन्ही आरोपी यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी वाकड पोलीस स्टेशन कडील गुन्हया व्यतिरीक्त पौड पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथील दोन ठिकाणी गुन्हे केलेची कबुली दिली आहे . त्याबाबत पोड पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण येथे गु.रजि . नं . २४९ / २०२१ भादविक ३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे . आरोपींनी गुन्हयातील चोरलेल्या सर्व बॅट – या टिळेकरनगर कोंढवा ब्रु पुणे येथील भंगार दुकानदाराला विकलेचे सांगीतलेने सदर ठिकाणी जावुन भंगार दुकानदार नामे

राजकुमार महादेव यादव वय ३६ वर्षे रा . सव्हे नं . ५२ , येवलेवाडी , टिळेकरवस्ती कोंढवा बुदुक पुणे यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे .

गुन्हयातील चोरलेल्या बॅट या जप्त करणेत आले आहेत . सदर गुन्हयात भादवि कलम ३८१,४११,३४ कलम वाढ करण्यात आली आहे . आरोपीची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त असून पुढील तपास सुरू आहे .

सदरची कारवाई मा . श्री कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ . संजय शिंदे सो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त , परि २ , पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत दिसले , सहा पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली

डॉ.विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संतोष पाटील पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सपोनि संतोष पाटील सपोनि श्री . अभिजीत जाधव , पोउपनि , गणेश तोरगल , पोलीस अंमलदार राजेंद्र काळे , बंदु गिरे , विक्रम कुदळ , विभीषण कन्हेरकर , बाबाजान इनामदार , बापु धुमाळ , विक्रांत चव्हाण , प्रमोद कदम , प्रशांत गिलबीले , कौन्तेय खराडे , कल्पेश पाटील , अतीश जाधव , दिपक साबळे , अतीक शेख , विजय गंभीरा यांनी मिळुन केली आहे .

(श्री आनंद भोईटे ) पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२ पिंपरी चिंचवड.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad

करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ACS POLICE CRIME SQUAD
DIGITAL WEB NEWS PORTAL

Links

ACS POLICE CRIME SQUAD

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *