हडपसर पोलीसांकडुन मोटारसायकल चोरी करणा या टोळी केली अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

प्रेस नोट दिनांक ३०/०७/२०२१ हडपसर पोलीसांकडुन मोटारसायकल चोरी करणा – या टोळीच्या आवळल्या मुसक्या त्यांचेकडुन एकुण १० मोटार सायकल सह एक ऑटो रिक्षा असा एकुण ०४,३०,००० / – रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ३ चोरटयांना केली अटक …..

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा.वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक २९ / ०७ / २०२१ रोजी १५/०० वाजताचे

सुमारास हडपसर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवा . प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पो.ना. अविनाश गोसावी , समीर पांडूळे , पो.शि. अकबर शेख , शाहीद शेख , प्रशांत टोणपे , शशिकांत नाळे , निखील पवार , प्रशांत दुधाळ

असे दोन पथकासह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो.उप.निरी . सौरभ माने आणि पो.ना.अविनाश गोसावी यांना एक संशयित इसम हा ससाणेनगर परीसरात कॅनॉलचे पुलावर क्रमांक नसलेल्या एका स्प्लेंडर मोटारसायकलवर थांबला होता . त्याचा तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने यांनी त्यास विचारपूस करणेस सुरवात केली त्यावेळी तो कावरा बावरा होवून उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला . त्यास अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे सोबतचे दोन साथीदार हे बाजूला हात दाखवून मोटार सायकल आणणेकरीता आत गेले असल्याचे सांगितले . त्यांनी दिलेली माहिती ही संशयास्पद वाटत असल्याने त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेवून त्याचे दोन साथीदारांची वाट पाहत पथकातील अधिकारी अमंलदार यांनी कॅनॉलच्या पुलावर सापळा लावला . त्याचवेळी त्याठिकाणी इतर पेट्रोलिंगचे पथकास बोलावून त्यांना देखील सदर सापळा कारवाईमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले . सुमारे अर्ध्या तासानंतर त्याचे दोन साथीदार एका शाईन मोटारसायकल तिचा क्रमाक एम.एच .१२ / एल.क्यू / ५१८३ वरून तो थांबलेल्या ठिकाणी आले .

त्याचवेळी पथकातील अधिकारी अंमलदार यांनी लागलीच त्यांना ताब्यात घेवून दोन मोटारसायकली सह हडपसर पोलीस ठाणे येथे आणले . त्यांना विश्वासात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी

( १ ) महेश लक्ष्मण धुमाळ वय २३ वर्ष , रा . आंबेगाव ता . दौंड जिल्हा पुणे

( २ ) प्रतिक संदीप काळे , वय २१ वर्ष रा.वेताळनगर केडगाव ता . दौंड जिल्हा पुणे

( ३ ) महेश दिलीप जगताप वय २३ रा . मळईवरती , कडेठाण ता.दौंड जिल्हा पुणे

असे सागितले . त्यांना मोटार सायकली बाबत विचारणा केली असता त्यांनी दोन्ही मोटारसायकल हया चोरी केलेल्या असून त्यातील एक मोटारसायकल ही गोंधळेनगर येथून चोरी केली आहे . त्याच मोटारसायकल वरून ट्रिपल शिट येवून दुसरी गाडी चोरून घेवून जाणेकरीता ससाणेनगर परीसरात आलो . तेथे महेश जगताप यास चोरीच्या गाडीसह कॅनॉलच्या पुलावर थांबून त्याचे दोन साथीदार महेश धुमाळ आणि प्रतिक काळे हे दुसरी गाडी चोरी करणेकरीता गेले . त्या दोघांनी तेथून एक शाईन मोटारसायकल चोरी करून आणली असल्याची माहिती दिली .

दोन्ही मोटारसायकल बाबत माहिती घेतली असता हडपसर पोलीस ठाणे येथे अनुक्रमे

( १ ) हडपसर पोलीस ठाणे गु.रजि.नं. ५७४/२०२१ भा.द.वि. ३७९ ( २ ) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५७२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोद असल्याचे निष्पन्न झाले . वरील आरोपी हे मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात सराईत असल्याचे गृहीत धरून त्यांचेकडे विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी खालील नमूद केलेप्रमाणे मोटारसायकल व रिक्षा चो – या केल्या असल्याची कबुली दिलेली आहे . त्यांचेकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघड झालेले आहेत .

१. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.नं -५४५ / २०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

२. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.नं -५५० / २०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

३. लोणी काळभोर पो.ठाणे गु – रजि.क्रं- २२३/२०२१ भा.द.वि कलम ३७९ एक ॲटो रिक्षा

४. लोणीकंद पोलीस ठाणे गु.रजि . ] – ९६५ / २०१८ भा.द.वि कलम ३७९ एक युनिकॉन मो.सायकल

५. चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ४७/२०२१ भा.द.वि कलम ३७९ अॅक्टिव्हा मोपेड

६. फौजदार चावडी पो . ठाणे सोलापूर गु.रजि.नं -४० / २०२० भा.द.वि कलम ३७९ पॅशन प्रो.मो.सा.

७. मौजे हातवळण ता.दौंड येथून हिरो स्प्लेंडर प्लस चोरी केली असल्याचे कबूल केले असून त्याचा चे.सी.क्रमांक 06A16F03870 असा आहे . सदर गाडीचे मालकीहक्काबाबत माहिती मिळून येत नाही .

८. मौजे बोरीपार्धी चौफुला साई दर्शन हॉस्पिटल समोर येथून एक शाईन मो.सा , चोरी केली असल्याचे कबूल केले असून त्याचा चे.सी क्रमांक MEAJC36JBE7811613 व इंजिन क्रमांक JC36E73312485 असा आहे . सदर गाडीचे मालकी हक्काबाबत माहिती मिळून येत नाही .

९ . भारती विद्यापीठ परीसरातून एक हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. चोरी केली असल्याचे कबूल केले असून त्याचा चे.सी.क्रमांक 00j20F29070 असा आहे . सदर गाडीचे मालकी हक्काबाबत माहिती मिळून येत नाही .

वरील प्रमाणे हडपसर पोलीस ठाणे ०४ लोणी काळभोर पोलीस ठाणे ०१ ( रिक्षा ) लोणीकंद पोलीस ठाणे ०१ चिखली पोलीस ठाणे ०१ फौजदार चावडी सोलापूर पोलीस ठाणे ०१ व इतर ०३ अशा एकुण १० मोटारसायकल व एक ऑटो रिक्षा असे एकुण ११ गुन्हे उघड झाले एकुण ४,३०,००० / – रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . वरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे .

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई अकबर शेख , शाहीद शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे सदरच्या कामगिरी बाबत मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सोा . पुणे शहर यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *