गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक -०२/०७/२०२१ गुन्हे शाखा युनिट – ६ , पुणे शहर जुन्य भांडणाचे व उसने पैशाचे कारणावरून कोयत्याने सपासप वार करून , दगडाने ठेचुन खुन करणारे चार नराधमांना १२ तासाच्या आत युनिट ६ ने केले जेरबंद .

ONLINE PORTAL NEWS

दि .०२ / ०८ / २०२१ रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री . गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील चैन स्नॅचिंग गुन्हयाचे तपासकामी पो.ना .७३१७ मुंढे , पो.ना .७८०५ कारखेले , पो.ना .६६४३ शिंदे , पो.शि .२९६१ व्यवहार.शि .८१५९ ताकवणे , पो.शि .८२०३ पवार यांचेसह खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना मांजरी स्मशानभुमी जवळ काळुबाई मंदीराचे बाजुला एक इसमाचा खुन झाला आहे अशी माहिती मिळाल्याने मा.गणेश माने पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा युनिट -६ , पुणे शहर व युनिट -६ चे पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली तेव्हा इसम नामे विकास सोनवणे याचा खुन हेंमत मोरे व त्याचे साथीदारांनी केलेला असुन ते केसनंद गावचे दिशेने वेरणा कार मधुन जात आहेत अशी खात्रीशीर माहिती पो.शि ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे यांना प्राप्त झाल्याने सदर माहिती बाबत मा . पोलीस निरीक्षक श्री गणेश माने यांना कळविली असता त्यांनी पो.शि. ऋषिकेश ताकवणे , पो.शि ऋषिकेश व्यवहारे , पो.शि सचिन पवार यांचे एक पथक व पो.ना नितीन मुंढे , पोना कानिफनाथ कारखेले , पो.ना नितीन शिंदे , अशी दोन पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व योग्य त्या सुचना देवुन एक पथक लोणीकंदचे व दुसरे पथक केसनंद गावच्या दिशेने रवाना केले . सदर बातमीप्रमाणे पथके रवाना झाल्यानंतर केसनंद गाव व लोणीकंद या दिशेने जावुन वेरणा कारचा पाठलाग करून खंडोबा माळ लोणीकंद येथे सदर कार थांबवली असता कार मधुन बाहेर पडुन आरोपीत हे पळुन जात असताना ताकवणे , व्यवहारे , पवार या पथकाने आरोपी नामे १ ) शुभम अशोक गायकवाड वय २३ वर्षे रा.शिवशंभोनगर संतोषी माता मंदिराजवळ , मांजरी खुर्द ता.हवेली जि.पुणे रा.सदर . २ ) अभिजित ऊर्फ नाना सुखराज महाले वय २३ वर्षे रा.सदर यांना वेरणा कार नं एम एच १२ / एच झेड / १३१४ हीच्या सह ताब्यात घेतले तसेच मुंढे , कारखेले , शिंदे यांच्या पथकाने ३ ) हेमंत किसन मोरे वय ३१ वर्षे रा.शिवशंभोनगर संतोषी माता मंदिराजवळ , मांजरी खुर्द ता.हवेली जि.पुणे ४ ) गोविंद बाबासाहेब बनसोडे वय २६ वर्षे रा.सदर यांना पकडुन ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपुस करता त्याने सांगितले की , दि .१ / ०८ / २०२१ रोजी रात्री ११/१५ वाजताचे सुमारास स्मशानभुमी काळुबाईमंदीराच्या बाजुला , मांजरी खुर्द येथे हेमंत मोरे , गोविंद बनसोडे , शुभम गायकवाड , अभिजीत महाले असे चौघानी मिळुन जुन्या भांडणाच्या व उसन्या पैशाच्या कारणावरुन इसम नामे विकास लक्ष्मण सोनवणे रा . मांजरी खुर्द , पुणे . याच्यावर कोयत्याने सपासप वार करून तसेच दगडाने ठेचून मारहाण केली आहे असे सांगितले . सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशन कडुन माहिती घेता लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९९ / २०२१ भादंवि कलम ३०२ , ३३६,१४३,१४७,१४८,१४९ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर , श्री अशोक मोराळे , मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री श्रीनिवास घाडगे , मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , नितीन मुंढे , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , प्रतिक लाहिगुडे , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे , सचिन पवार , ऋषिकेश टिळेकर , शेखर काटे , नितीन धाडगे , सुहास तांबेकर , तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी यांचे पथकाने केली .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *