हडपसर पोलीसांकडुन मोटारसायकल चोरी करणा – या टोळीचा पर्दाफाश

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

प्रेस नोट दिनांक ११/०६/२०२१ हडपसर पोलीसांकडुन मोटारसायकल चोरी करणा – या टोळीचा पर्दाफाश त्यांचेकडुन एकुण १४ मोटर सायकल ( यामाहा आरएक्स १०० -३ , शाईन – १ , होन्डा युनिकॉर्न- ३ , अॅक्टीवा -१ , स्प्लेन्डर -४ , टि.व्ही.एस. व्हिक्टर – १ , बजाज कॅलीवर- १ , ) असा एकुण ०४,२०,००० / – रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करुन हडपसर पोलीसांनी गुन्हेगारांना केले जेरबंद हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा.वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता दिलेल्या सुचनाप्रमाणे दिनांक- १०/०६/२०२१ रोजी १५/०० वाजलाचे सुमारास हडपसर पोलीस स्टेशनचे तपासपथकाचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार ५८३१ सोनवणे , पोलीस हवालदार . २८०० गायकवाड , पो.ना. ३२४ गोसावी , पो . ना . ७५६६ पांडूळे , पोलीस शिपाई ८६ ९२ शेख , पोलीस शिपाई ४७ ९ शाहिद शेख , पोलीस शिपाई ८२३७ टोणपे , पोलीस शिपाई ७६८४ नाळे , पो.शि .८३५६ पवार , व पो.शि .८३९२ दुधाळ असे मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो .. हडपसर स्टेशन , पुणे यांचे दोन पथके तयार करुन हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो.शि अकबर शेख व प्रशांत दुधाळ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन परीसरात चोरी करणारे तीन इसम संशयीत चोरी केलेल्या मोटार सायकल वर फिरत असुन ते शेवाळवाडी पेट्रोल पंपाकडुन मांजरीकडे येणार असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे शेवाळवाडी मांजरी पुणे रोडवर मिळाले वर्णनाचे तिन इसम व मोटर सायकलचा शोध घेणेकरिता थांबले असता एका लाल रंगाचे युनिकॉर्न मोटार सायकलवर तीन इसम सोलापूर रोडने मांजरीकडे जोरात येत असताना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळुन जावु लागले . म्हणुन वरील स्टाफसह त्यांचा पाठलाग करुन , थोडयाच अंतरावर मोटार सायकलसह पकडून , त्यांना आहे त्या परिस्थीतीत ठेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १ ) फैज आरिफ अन्सारी ऊर्फ बेनटेन वय २२ वर्षे रा . स.नं. ७४ लेन नंबर -२० / ए मोहम्मदवाडी रोड , बागवान स्टोर जवळ सय्यदनगर हडपसर पुणे . व इतर दोन विधी संघर्षीत बालक असल्याचे समजले . तेव्हा त्यांना पळुन जाण्याचे कारण विचारले असता ते उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले . तेव्हा त्यांचेकडे असलेल्या लाल रंगाची होन्डा युनिकॉर्न कंपनीच्या मोटर सायकल नंबर- एम.एच. ४३ ए.पी. ६०१ या गाडीचे कागदपत्राची मागणी केली असता नमूद मोटार सायकलचे कागदपत्रे त्यांचेकडे नसल्याचे त्यांनी सांगितले . तेंव्हा त्यांना तपास पथकातील स्टाफच्या मदतीने मोटार सायकलसह हडपसर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे असलेल्या मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची मोटर सायकल त्यांनी साडेसतरानळी हडपसर पुणे येथुन चोरी केल्याची कबुली दिली . तसेच त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की , फैज ऊर्फ बेनटेन हा हडपसर परीसरामध्ये पाव विक्रीचा व्यवसाय करीत असुन त्याच्या आडुन तो परीसरातील वाहनांची रेकी करीत असे व त्यानंतर आपल्या वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने त्यांनी चो – या केले असल्याची कबुली दिलेली असुन त्यांचेकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघड झालेले असुन ते खालील प्रमाणे
सायकलचा
१. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ४१७/२०२१ भा.द.वि कलम ३७९२. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ४२४/२०२१ भा.द.वि कलम ३७९३. हडपसर पोलीस स्टेशन गु – रजि.क्रं- ४२२/२०२१ भा.द.वि कलम ३७९४. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.कं- १८७/२०२१ भा.द.वि कलम ३७९५. रहिमतपुर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- १२६/२०२० भा.द.वि कलम ३७ ९ ६. यवत पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ५०५/२०२१ भा.द.वि कलम ३७९७. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं : – ७६१/२०१८ भा.द.वि कलम ३७९८. खोपोली पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- १८२/२०१२ भा.द.वि कलम ३७९९ . हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- १३१६/२०२० भा.द.वि कलम ३७९१०. हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.क्रं- ३४१/२०२१ भा.द.वि कलम ३७९ वरील प्रमाणे १० वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असुन त्यांच्या ताब्यातून एकुण १४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन असा एकुण ४,२०,००० / – रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.व इतर चार मोटार सायकलचा मालकांचा शोध घेण्याचे काम चालु आहे . तसेच त्यांचे इतर दोन साथीदार हे फरार असुन त्यांचा शोध घेत आहोत . सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि . ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , प्रताप गायकवाड , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , पोलीस शिपाई शाहीद शेख , अकबर शेख , शशिकांत नाळे , सचिन जाधव , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *