कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’ Jun 9, 2021
ACS POLICE CRIME SQUAD 9822331526
कोंढव्यात गुन्हेगारांचा तलवारीसह धुडगुस !जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून हॉस्पिटलची फोडली काच , बाहुबली तलवारीने हफ्ता वसुलीसाठी ‘दहशत’
Jun 9, 2021
पुणे : कोंढव्यात गुन्हेगारांच्या टोळीने रस्त्यात तलवारी नाचवत दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावून एकावर वार करुन जखमी केले आहे. हॉस्पिटलची काच फोडून नुकसान केले आहे.
पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने या टोळक्याने पुन्हा अशरफनगरात तलवारी हवेत फिरवत दुकानदारांना दुकाने बंद करायला भाग पाडत होते.
शेवटी नागरिकांनीच त्यांच्याकडील तलवार काढून घेतली.
कोंढवा पोलिसांनी शहबाज ऊर्फ लंबु खान (वय २४, रा. अशरफनगर), अरबज खान (वय ३०, रा. अशरफनगर) व त्यांच्या इतर ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. ओबेदउल्ला अब्दुलरहिम खान (वय ३३, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. खान यांचे अशरफनगर येथे शिफा पॉली क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे.
सोमवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दोघे जण अचानक आले त्यांनी तेथे बसलेल्या २ महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे शेटर लावून घ्या अशी दमबाजी केली होती.
त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने खान बाहेर आले.
त्यांनाही ते शेटर बळजबरीने लावून घेण्याबाबत सांगू लागले परंतु त्यांनी विरोध केल्यावर हॉस्पिटलच्या काचेवर तलवार मारुन काच फोडली. तेथून ते निघून गेले.
बाहेर जाऊन त्यांनी हवेत तलवारी फिरवून मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन या भागातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करायला लावली.
अशरफनगर गल्ली नं. १२ मध्ये जाऊन तेथे रस्त्यावर उभे असणार्या ४ ते ५ जणांना त्यांच्याकडील कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पाहून ते पळून गेले.
या दरम्यान हे टोळके लब्बैक मेडिकल स्टोअर्सवर जाऊन मेडिकलचे शटर खाली घ्यायचे, मेडिकलमधून त्यांना पाहिजे ते औषध फुकट द्यावयाचे नाही दिले तर मारहाण करण्याची व मेडिकल स्टोअर्सची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यावेळी या ठिकाणी भाजी विक्रेते सलिम शेख यांची भाजीची गाडी पलटी केली चहा विक्री करणार्या महिलेला जबरदस्तीने चहा विक्री बंद करून हफ्ता देण्यास सांगितले.
गुफरान अन्सारी यांचे किराणा दुकान बंद करुन त्याला कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तोडफोड करणार्यांच्या दहशतीमुळे खान यांनी तक्रार दिली नव्हती.
धक्कादायक ! हस्तांदोलन करताना चक्क राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली वाजवली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)
दरम्यान ८ जून रोजी खान हे दुपारी साडे बारा वाजता तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात जात असताना हे दोन्ही गुंड त्यांच्या हॉस्पिटलच्या परिसरात तलवारी घेऊन हवेत फिरवून, मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन सर्व दुकानदारांना
‘हप्ते द्या, नाहीतर दुकान बळजबरीने बंद’
करायला भाग पाडत दहशत पसरवित होते.
त्यावेळी लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडील तलवार जबरदस्तीने हिसकावून घेतली.
तेव्हा आमच्याविरुद्ध कोणी तक्रार दिली तर जीवे मारू अशी धमकी देऊन ते निघून गेले.
नागरिकांनी ही तलवार कोंढवा (Kondhwa) पोलिसांकडे जमा केली आहे. त्यानंतर पोलिसांनी हालचाल करुन गुन्हा दाखल केला आहे.