हडपसर पोलीसांची कामगिरी हडपसर पोलीसांकडून ७ घरफोडया उघडकीस १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
हडपसर पोलीसांकडून ७ घरफोडया उघडकीस १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
दिवसा घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार अटक ”
हडपसर पोलीसांची कामगिरी हडपसर पोलीसांकडून ७ घरफोडया उघडकीस १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
हडपसर पोलीस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये दिवसा घरफोडी होणारे गुन्ह्रांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने श्री.अरविंद गोकुळे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. विश्वास डगळे साो, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे साो, यांनी तपास पथक अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, व तपासपथक अंमलदार यांची टिम तयार करून दिवसा घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहीती संकलीत केली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवण्यात आली.
हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून केलेल्या तांत्रीक विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहीद शेख, समीर पांडुळे आणि शशिकांत नाळे यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी
आरोपी नामे अमिर ऊर्फ लकी सलिम पठाण वय २४ वर्षे, सध्या राहणार- अष्टविनायक सोसायटी समोर, फुरसुंगी रोड, गजानन नगर, हडपसर पुणे मुळ- राऊतनगर, जुना सराटी रोड, दिपकभाऊच्या गोठ¬ाजवळ, अकलुज जि. सोलापूर यास ताब्यात घेतले.
त्याचेकडे केले तपासात, मागील २ महिन्याचे कालावधीमध्ये त्याने हडपसर पोलीस ठाणे हद्दीत येवून त्याचा साथीदार नामे संदीप ऊर्फ रीहान ऊर्फ मॅक्स गायकवाड रा शनीनगर, कात्रज पुणे याचेसह दिवसा घरफोडी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडून एकूण ०६ गुन्हे उघडकीस आले.
असून १०३.६१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले आहे. नमुद आरोपीस अटक करुन त्याची दिनांक- १२/०३/२०२२ रोजीपर्यत अशी ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे.
तसेच हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर- २३०/२०२२भा.द.वि.कलम- ४५४,३८० या दाखल गुन्ह्रात फिर्यादी मंगल बबन शिंदे वय ५२ वर्षे धंदा घरकाम रा.स.नं. १६५ माळवाडी, मारुती मंदिराशेजारी, कामठेवस्ती हडपसर पुणे यांनी त्यांचे घरातील दागीने चोरी झालेबाबत तक्रार दिली होती. दाखल गुन्ह्राचा तपास करीत असताना, फिर्यादी यांचा मुलगा आदित्य ऊर्फ दादया बबन शिंदे वय २३ वर्षे रा. कामठे वस्ती, मारुती मंदिराशेजारी,माळवाडी हडपसर पुणे. हा पोलीस रेकॉर्डवरिल गुन्हेगार असल्याने त्यानेच चोरी केली असावी या संशयावरुन हडपसर पोलीस ठाणेकडील तपासपथकाने त्यास ताब्यात घेवून तपास केला असता, त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केले आणि चोरून नेलेले २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
हडपसर पोलीस ठाणेकडील तपासपथकाने मागील महिन्याभरात एकूण २७ मालमत्तेचे गुन्हे उघड केले असून त्यामध्ये १४ – घरफोडी, ०२ – जबरी चोरी, ०२ – वाहनचोरी, आर्म अॅक्ट प्रमाणे – ०२ पिस्तुल २७ राऊंड, व ०७ ज्वेलर्सना फसविल्याचे फसवणुकीचे गुन्हे त्यामध्ये रुपये ९,९४,०००/- किं. चा माल तसेच इतर चोरी – ०१ गुन्हा असा सर्व कारवाईमध्ये मिळून एकूण ३३,३२,०००/- कि.रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. नामदेव चव्हाण साो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा.नम्रता पाटील साो, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ 5 पुणे शहर, यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई साो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. अरविंद गोकुळे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. विश्वास डगळे साो, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे साो, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, अंकुश बनसुडे शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६.
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad