पीएम मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; आजपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

pune metro : पीएम मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन; आजपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

पुणे; पीएम कृषीमहाविद्यालयातून निघालेत, पुढील 5 ते 10 मिनिटांत गरवारे कॉलेजजवळ पोहचतील, असा अलर्ट आला आणि काही वेळातच पंतप्रधानांच्या वाहनांचा दिसू लागला. बघाता एसपीजी कामांडोंच्या ताफा हाय सिक्युरिटी गाड्यांच्या ताफ्यात पंतप्रधान गरवारे मेट्रो स्थानक येथे पोहचले. अन काही मिनिटांतच त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन झाले. त्यानंतर आजपासून मेट्रो सर्वसामान्यांसाठी खुली झाली.

गरवारे मेट्रो स्थानकाजवळ गाडीतून उतरून आजूबाजूच्या सर्वांना हात दाखवत, नमस्कार करत पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रवेश केला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गरवारे मेट्रो स्थानक सज्ज होते. मेट्रोचे अधिकारी, महापौर व अन्य राजकीय मंडळींनी पंतप्रधानांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर गरवारे मेट्रो स्थानकाची पाहणी करत पंतप्रधानांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन दरम्यान प्रवास केला.

मेट्रो स्थानक सजले
गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आले होते.

बघ्यांची गर्दी
परिसरात मोदींना पाहण्यासाठी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांची रस्त्यांवर काही ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसते. तर काही ठिकाणी नागरिक आपल्या इमारतीच्या खिडकी मधून पाहताना दिसले.

गरवारे कॉलेज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी गरवारे कॉलेज परिसरात पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरातून कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. येणा जाणारा प्रत्येकाला पायी चालणाऱ्याला सुद्धा या परिसरात प्रवेश बंद होता. यामुळे पुणेकर नागरिक नाराज झाले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *