हडपसर पोलीस स्टेशन च्या अधिकारी / अंमलदारा चांगली कामगिरी केले बद्दल आयुक्तांकडून सन्मान.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

हडपसर पोलीस स्टेशन च्या अधिकारी / अंमलदारांचा पोलीस आयुक्तांकडून सन्मान.

मा नम्रता पाटील सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर आणि मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे यांनी वेळोवेळी हडपसर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या ५ महिन्यात मुद्देमाल निर्गती करताना २३ मालमत्तेच्या गुन्हयातील ६७३ ग्रॅग सोने ८७ गुन्हयातील ११३ वाहने, ४२ गुन्हयातील १०७ मोबाईल ३ रोख रक्कमांचे गुन्हे असा एकूण १५५ गुन्हयातील फि.रु. १,६५,८३,३००/ चा मुद्देमाल फिर्यादीस परत केला. हे निर्गतीचे प्रमाण पुणे शहरात सर्वाधिक असल्याने या कामगिरीबद्दल मुद्देमाल विभागाकडील पोलीस अंमलदार गोबिंद इरकर, सुदर्शना म्हांगरे यांना प्रशस्तिपत्र देवुन त्यांचा सन्मान केलेला आहे.

तसेच हडपसर हद्दीत वर्षानुवर्षे कोणत्याही रेकॉर्डवर नसेलेली हडपसर परिसरात बेवारस पडलेली २४९ दुचाकी वाहने एकत्रित करून सर्व वाहनांचे चासीस आणि इंजिन नंबर्स घेऊन आर.टी.ओ. कार्यालयाकडून २१६ वाहन मालकांचे नाव पत्ते मिळविले. त्यातील ८ वाहने चोरीच्या गुन्हयातील आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे २४९ दुचाकी वाहनांची सर्व माहिती बेवारस अभिलेखावर नोंद झाली. या कामगिरीबद्दल पोलीस अंमलदार शरद धांडे, उमेश शेलार यांना प्रशस्तिपत्र देवुन त्यांचा सन्मान केलेला आहे.

तसेच हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर कडील तपासपथकाने १० फेब्रुवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत एकुण ४० गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये १४ घरफोडी, १३ वाहनचोरी, सराफांची फसवणुक ७ गुन्हे ३ जबरी चोरी २ इतर चोरी १ आर्म अॅक्ट असे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण कि.रु. ४२.९०,५००/- चा माल हस्तगत करून उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल तपासमथकाचे प्रभारी विजयकुमार शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार प्रदिप सोनवणे, अविनाश गोसावी, संदिप राठोड, अकुश बनसुडे, श्रीकांत पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखिल गवार, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे सुरज कुंभार, रियाज शेख यांना प्रशस्तिपत्र देवून त्यांचा सन्मान केलेला आहे.

वरील तिन ही कामगिरी पुणे शहर पोलीस दलात सर्वोत्तम असल्याने त्याची दखल घेवून मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी बुधवारी आयोजीत केलेल्या साप्ताहीक आढावा बैठकीत विशेष प्रशस्तिपत्र देवून सन्मान केलेला आहे. त्यावेळी पुणे शहर पोलीस दलातील सर्व प्रभारी अधिकारी है हजर होते. त्यामुळे अधिकारी / अंमलदार यांचेमध्ये पुढील काळात आणखी जोमाने काम करण्यासाठी विशेष प्ररेणा मिळाली आहे.

मागिल ५ महिन्याचे काळात अधिकारी / अंमलदार यांच्यासोबत सतत राहून त्यांचेकडून विशेष कामगिरी करून घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दिगंबर शिंदे, श्री विश्वास ढगळे यांचेही पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी अभिनंदन केले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *