कोंढवा पोलिसांचे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान, apcs. news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा पोलिसांचे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान,
पुणे :- दि :-०५/०९/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन असतील, रूट मार्च असतील, रात्रीच्या वेळेस असलेली गर्दी यावर नियंत्रण ठेवणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थाच्या दृष्टीने कोंढवा हद्दीत झालेल्या धार्मिक तणावावर योग्यते नियंत्रण केले बाबत असे अनेक कार्य कोंढवा पोलिसांनी चांगल्या प्रकारे हाताळले आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आणखीन सुधारण्यासाठी याचा फायदा झाला आहे.

त्यासाठी कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले, एलआयबी विभागाचे पोलीस हवालदार अमोल फडतरे आणि पोलीस अंमलदार शशांक खाडे यांना हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यानंतर सत्कारमूर्ती अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन्मानित केल्यामुळे सर्वांनी आभार व्यक्त केला आहे.या सन्मानामुळे सर्व कर्मचारी व अधिकारी आणखीन जोमाने काम करतील असे विश्वास त्या ठिकाणी असलेल्या पत्रकारांनी व्यक्त केले. आणि या सत्कारामुळे आमच्या
सर्वांची जबाबदारी वाढली असल्याचे वपोनि सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर व जिल्हा समन्वयक मुज्जम्मील शेख यांनी सांगितले की, कोंढवा पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने कोंढव्यात काम करत आहे. चांगल्या कामाची प्रशंसा केलीच पाहिजे. आणि त्या कामाचा गौरव केलाच पाहिजे. यामुळे आज आम्ही हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वांनी मिळून कोंढवा पोलिसांचा सन्मान घेतला आहे.
यावेळी पोलीस क्राईम न्युजचे संपादक वाजीद खान, पत्रकार गणेश जाधव, सोहेल शेख, सतीश जाधव, फरहान शेख, अशपाक शेख, अलिम शेख, अझहर बैग, शाबाझ शेख, आयान सय्यद, दानिश शेख व आदी उपस्थित होते.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad