पुण्यातील बाणेरचा महावितरणचा सहायक अभियंता ५० हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.ठिकाण :- महावितरण कार्यालय उपकेंद्र बाणेर, पुणे येथील कार्यालयाचे आवारात.
पडताळणी दिनांक, दिनांक २८/०८/२०२३, दि. २९/०८/२०२३ व दि. ३१/०८/२०२३, सापळा दिनांक, ०१/०९/२०२३
पुणे,दि.०१:-(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
पुणे शहरातील बाणेर येथील सरकारी विद्युत ठेकेदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरण कार्यालयाच्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

रविंद्र नानासाहेब कानडे (वय-३७) असे लाच घेताना पकण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.०१) महावितरण कार्यालय उपकेंद्र बाणेर येथील कर्यालयाच्या आवारात केली.
याबाबत एका ठेकेदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. व तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आर.एम.सी. प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजना १.३ टक्के तत्वाच्या (MSEDCL) नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी उपकेंद्र बाणेर कार्यालयातील सहायक अभियंता रविंद्र कानडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबी कार्यालयात कानडे विरुद्ध तक्रार केली. एसीबीच्या पथकाने २८,२९ ते ३१ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यानुसार पथकाने शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रविंद्र कानडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad