वाकड पोलिस स्टेशन ची कामगिरी सराईत वाहन चोरास अटक ७,०५,०००/रु.किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत ,एकुण १३ गुन्हे उघड .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पिंपरी चिंचवड दिनांक ३०/०४/२०२२ वाकड पोलीस स्टेशन

तपास पथकातील सपोनि श्री . संतोष पाटील व तपास पथकातील अंमलदार यांचेसह वाकड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विश्वासु बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , तापकीर मळा चौक , रहाटणी , पुणे येथे तीन इसम दोन मोटार सायकलवरून मोटार सायकल विक्री करणेकरीता आले आहेत .

त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचुन तीन संशयीत इसमांना दोन दुचाकीसह शिताफीने ताब्यात घेवून त्यांचे नाव , पत्ता नावे अनुक्रमे .

1 ) चंद्रकांत ऊर्फ बाळु हरीभाऊ घोलप , वय ३४ वर्षे , रा . मुपो . हरीचंद्र पिंपरी चिंचवडगाव , ता . वडवली , जि . बिड I

2 ) परशुराम ऊर्फ बाबरी रामकिसन नागरगोजे , वय २२ वर्षे , रा मुपो . नागरगोजे वस्ती चिंचाळा ता . वडवळी , जि . बिड

3 ) योगेश ज्ञानेश्वर बादाडे , वय २४ वर्षे , रा . पोखरी हुनमान मंदीराजवळ , ता . जि . बिड अशी सांगीतली .

त्यांचे ताब्यातील दोन वाहने , हिरो होंडा पॅशन मो.सा. नं . MH 13 CF 3397 व हिरो स्प्लेण्डर मो . सा . नं . MH 23 AV 9502 याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . त्यांचे ताब्यात मिळालेल्या हिरो होंडा पॅशन मो.सा.नं. MH 13 CF 3397 हीची माहीती घेतली असता त्याबाबत वाकड पोलीस स्टेशन गु.रजि . नं . 283/2022 भादविक 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदर तीन्ही इसमांना दाखल गुन्ह्याचे कामी दिनांक 24/04/2022 रोजी 18.45 वा . अटक करणेत आली असुन दि . 29/04/2022 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून अटक आरोपींकडे कौशल्यपुणे तपास करणेत आला . आरोपींनी दाखल गुन्ह्याव्यतीरिक्त इतरही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांचेकडुन एकुण ७,०५,००० / – रुपये किंमतीच्या १३ माँटार सायकली व गुन्हे करणेसाठी वापरलेली आरोपी योगेश बादाडे याची मो.सा.नं. MH 23 AV 9502 असे एकुण १४ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत .

आरोपी यांनी वाहन चोरी केलेल्या गुन्ह्यांची यादी खालिलप्रमाणे

( 1 ) वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. – 283 / 2022 भादवि 379

( 2 ) वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. 311 / 2022 भादवि 379

( 3 ) आळंदी पो.स्टे . गु.र.नं. 130/22 भादविक 379

( 4 ) भोसरी पो.स्टे . गु.र.नं. 293 / 22 भादविक 379

( 5 ) भोसरी पो.स्टे गु.र.नं. 318 / 22 भादविक 379

( 6 ) भोसरी एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. 224/22 भादविक 379 ( 7 ) चाकण पो.स्टे . गु.र.नं. 566 / 22 भादविक 379

( 8 ) म्हाळुंगे पो.स्टे . गु.र.नं. 512/22 भादविक 379

( 9 ) देहुरोड पो.स्टे . गु.र.नं. 992 / 22 भादविक 379

( 10 ) विश्रामबाग पो.स्टे . गु.र.नं. 55 / 22 भादविक 379

( 11 ) सुपा पो.स्टे . गु.र.नं. 108/22 भादविक 379

( 12 ) बिड शहर पो.स्टे.गु.र.नं. 62 / 22 भादविक 379

( 13 ) आष्टी पो.स्टे . हद्दीतुन चोटलेली आरटीओ नंबर नसलेली हिरो एचएफ डिलक्स मोटार सायकल ..

सदर गुन्हयातील आरोपी नामे

1 ) परशुराम ऊर्फ बाबरी रामकिसन नागरगोजे ,

2 ) योगेश ज्ञानेश्वर बादाडे , यांचेवर माजलगाव शहर पो.स्टे . जिल्हा बिड

येथे पुढील दोन गंभीर गुन्हे दाखल असुन गुन्हा घडले पासुन फरार झालेनंतर त्यांनी पुणे येथे येवुन वरील प्रमाणे गुन्हे केलेचे निष्पन्न झालेले आहे .

1 ) माजलगाव पो.स्टे जि.बिड गु.रजि . नं . 73/2022 भादविक 307 , 39 7,32 9 , 34 2 ) माजलगाव पो.स्टे जि.बिड गु . रजि . नं . 74/2022 भादविक 143 , 147 , 148 , 504 , 506 , 427 , 34 आर्म अॅक्ट 4 ( 25 ) आरोपी चंद्रकांत ऊर्फ बाळु हरीभाऊ घोलप हा वाहन चोरीचा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी 11 गुन्हे दाखल असुन त्याला काही गुन्हयात शिक्षा झालेली आहे .

सदरची कारवाई मा . श्री . अंकुश शिंदे सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . डॉ . संजय शिंदे सो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे सो , पोलीस उप आयुक्त , परि 2 , पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत डिसले , सहा . पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा . श्री . सत्यवान माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संतोष पाटील पोलीस निरीक्षक ( गुन्हे – 1 ) , रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक ( गुन्हे – 2 ) , सपोनि . संतोष पाटील , सपोफौ . बिभीषण कन्हेरकर , सपोफौ . बाबाजान इनामदार , सपोफौ . राजेंद्र काळे , पोहवा . बापुसाहेब धुमाळ , पोहवा वंदु गिटे , पोहवा . विक्रम कुदळ , पोहवा . विजय गंभीरे , पोहवा . दिपक साबळे , पोना . अतिश जाधव , पोना . प्रमोद कदम , पोना . विक्रांत चव्हाण , पोना . अतिक शेख , पोना . प्रशांत गिलबीले , पोशि . कल्पेश पाटील , पोशि . कौतेंय खराडे , पोकॉ . अजय फल्ले यांनी मिळुन केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *