बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणा – यास , कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -१२/०१/२०२२ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर

बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणा – यास , कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद .

पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व योगेश कुंभार ची कामगिरी .

पुणे शहरात कोराना रोगाचे पेशन्ट वाढत असल्याने पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन कोरोना नियमांचे पालन न करणा – या व मास्क न वापरणा – या नागरिकावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) गोकुळ राऊत यांनी सुचना दिल्या होत्या .

त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे , तपास पथक अंमलदार योगेश कुंभार , गणेश चिंचकर , दिपक जडे , अमोल हिरवे , अभिजीत रत्नपारखी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत असताना खड़ी मशीन परिसरात आलो तेथे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व योगेश कुंभार यांना बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की , मनोज खाडे नावाचा बिबवेवाडी पोलीस ठाणे अभिलेखावर रेकार्डवर असणारा इसम हा चॉकलेटी रंगाचा फुल टि शर्ट व केस वाढविलेला कुल उत्सव सोसायटीकडे जाणा – या रोडच्या कार्नरवर , कात्रज ते उंड्री हायवे रोडवर थांबलेला असुन त्याच्या कमरेला त्याने पिस्टल बाळगलेले आहे . मिळालेली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी योग्य ती कारवाई करण्यात आदेशीत केले . तेव्हा सदर इसमाचा शोध घेत असताना तो कुल उत्सव सोसायटीकडे जाणा – या रोडच्या कार्नरवर कात्रज ते उंड्री हायवे रोडवर कोणाची तरी वाट पाहत होता . सदर इसमाचे वर्णन बातमी प्रमाणेच असल्याचे खात्री झाल्याने त्याचे हालचालींवर लक्ष्य ठेवून थांबुन राहिलो . काही वेळातच संशयीत इसम हा तेथुन निघुन जावु लागला . त्यावेळी आम्ही त्यास सोबतचे स्टाफचे मदतीने पकडुन त्यास त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे

नाव मनोज उर्फ सारस रमेश खाडे , वय २९ वर्षे , रा . १४४ / पी , सत्यविर मित्र मंडळा जवळ , शिव दर्शन , पुणे

असे असल्याचे सांगितले . आम्ही त्यास पकडल्यापासुन तो सतत त्याचे कमरेच्या उजव्या बाजुला हात लावुन काहीतरी लपवत असल्याचे दिसले . त्यास कमरेला वारंवार का , हात लावत आहे ? याबाबत विचारणा करता तो आम्हांस उडवा – उडवीचे उत्तरे देवु लागला . तेंव्हा सोबत असलेल्या पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे डाव्या बाजुच्या कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक ५०,००० / – रु देशी बनावटीचा पिस्टल व त्याच्या मॅगझीनमध्ये ३०० / – रु तीन जिवंत काडतुस मिळुन आले ते जप्त करण्यात आले आहे .

सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन ३८/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -५ , पुणे शहर व सहा . पोलीस आयुक्त , वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली , अनिल सुरवसे , सहा . पोलीस निरीक्षक हे करीत आहेत . सदर कामगिरीबाबत मा . पोलीस आयुक्त सो . अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *