पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले,
५ हजार मागून तडजोड अंती २ हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागागाची कारवाई.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. प्रतिनिधी,
५ हजार मागून तडजोड अंती २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागागाने चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.
अनिल निवृत्ती होळकर वय ५२ असे लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. होळकर हे सध्या चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,
तक्रारदार यांनी एका महिलेला ५० हजार रूपये उसने दिले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी व त्या
महिलेची कोणतीही तक्रार न घेण्यासाठी पोलिस हवालदार होळकर यांनी तक्रारदाराकडे ५ हजार
रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ हजार रूपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार
यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार होळकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad