हडपसर पोलिसांची मोठी कारवाई,अवैध गुटखा ,ने,भरलेला ट्रक,केला जप्त.

ACS POLICE CRIME SQUAD

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर धडक बाज कामगिरी.

दिनांक ०९ /०१/२०२२ लाखो रुपयांचा अवैध गुटखा केला जप्त हडपसर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी .

हडपसर येथे, पुणे-सोलापूर महामार्गावर, १५ नंबर टेकवडे, पेट्रोल पंपावर , गुटख्या,ने, भरलेला ट्रक, हडपसर पोलिसांनी पकडला आहे,
महाराष्ट्रात कोरोना निर्बंध लागू, झाल्यानंतर, शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमानात,,गुटखा आला होता,
राज्य सरकारने नुकतेच निर्बंध लागू, केल्यानंतर,
पहिल्याच रात्री कर्नाटकावरून, गुटख्या, ने भरलेला कंटेनर ट्रक, हा पुणे शहरात येत होता,

दिनांक ०९ /०१/२०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,

इसम नामे सर्फराज शेख रा . गोकुळनगर अप्पर डेपो बिबवेवाडी पुणे हा त्याचे आयशर ट्रक नं . MH-14 GU 8462 मध्ये तंबाखुजन्य पदार्थ गुटखा हा निपाणी व विजापुर येथून सोलापुर रोडने फुरसुंगी पुणे येथील गोडाऊनमध्ये जात आहे .

वगैरे बातमी मिळाल्याने पोउपनि अविनाश शिंदे यांनी लागलीच सदरबाबत श्री अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवून त्यांनी सदर ठिकाणी स्टाफसह जावून खात्री करून कारवाई करणेबाबत सांगितलेवरुन १५ नंबर चौकाजवळ सोलापूर रोड या ठिकाणी पोलीस निरीक्षक , (PSI) अविनाश शिंदे , व तपास पथकातील , (D .B , रूम कडील , ) शाहिद शेख व प्रशांत टोणपे , यांना मिळाली , मिळालेल्या माहिती नुसार , पोलिसांनी ट्रक ची झडती घेतली ट्रक नं . MH-14 GU 8462 हि येताना दिसताच सदरील ट्रक चालकास थांबवून ट्रक टेकवडे पेट्रोल पंपाच्या आत घेऊन ट्रक वरील चालक यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव – सामीउल्लाह मुर्तजा हुसैन वय ५१ वर्षे रा . फाईल टिंबर कॉर्पोरेशन मुस्तफा बाजास एसएस मार्ग मुंबई मुळगाव मुर्तजा ग्राम मुडीलाकला पोस्ट लोहरसन संत कबीर नगर उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले त्याचेकडे ट्रकमधे काय आहे याबाबत चौकशी करता , तो उडवाउडीवची उत्तरे देवून लागलाने , ट्रक ची पाहणी केली असता त्यामध्ये हिरा पान मसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आहे . त्यावेळी त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदरील गुटखा माल हा निपाणी कर्नाटक येथून घेवून आला असून , तो माल फुरसुंगी पुणे येथील गोडाऊनमध्ये खाली करण्यासाठी जात असल्याचे सांगितले . त्यामुळे लागलीच वरिष्ठांना कळवून , अन्न सुरक्षा अधिकरी , अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचेशी संपर्क करुन ,

त्यांना सदरबाबत कळविले असता , श्री.अनिल सदाशिवराव गवते अन्न सुरक्षा अधिकारी , अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे व पोनि गुन्हे श्री . विश्वास डगळे हे स्टाफसह येवून , दोन पंचासमक्ष आयशर ट्रक नं . MH-14 GU 8462 यामध्ये मिळुन आलेल्या हिरा पान मसाला या मालाची पाहणी करुन , सविस्तर पंचनामा करुन , तपासणीकामी सॅम्पल घेवून , सदरील सर्व हिरा पान मसाला गुटखा माल अंदाजे एकुण किंमत रुपये ४६,००,००० / – व त्याची वाहतुक करणारा ट्रक जु.वा.किं.अं. २५,००,००० / – रुपये वगैरे असा एकुण ७१,००,००० / – रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त केलेला आहे . मात्र बाजारभावाने हा माल दुप्पट किंमतीस लोकांना विकला जात असल्याने बाजारभावाने जप्त गुटखा मालाची किंमत अंदाजे ९ ०,००,००० / – रुपयांपर्यत होवू शकते . त्यामुळे सदरबाबत श्री . अनिल सदाशिवराव गवते अन्न सुरक्षा अधिकारी , अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे

यांनी फिर्याद दिलेवरुन हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे भा.द.वि. कलम २७२,२७३ , ३२८ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ ( २ ) ( i ) , २६ ( 2 ) ( iv ) सहवाचन कलम ३ ( i ) ( zz ) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ नुसार गुन्हा केला आहे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री . अविनाश शिंदे हे करीत आहेत . सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त सो . श्री . नामदेव चव्हाण , मा . पोलीस उपआयुक्त सो श्रीमती नम्रता पाटील , मा . सहायक पोलीस आयुक्त सो . श्री . बजरंग देसाई हडपसर विभाग , मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो . श्री . अरविंद गोकुळे पोनि गुन्हे श्री . दिगंबर शिंदे , पोनि गुन्हे श्री विश्वास डगळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि रत्नदिप गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक आविनाश शिंदे , पोशि शाहिद शेख व पोशि टोणपे , पो.हवा . गव्हाणे , पो.ना. १४९९ मद्देल , पोना शरद धांडे , पोशि खरात यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *