चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर मोक्याच्या गुन्हयात जामिनावर सुटुन जामिन मुदतीत घरफोडी करणा – या अट्टल चोरटयास अवघ्या दोन दिवसांत चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक – ०८/०७/२०२१ चंदननगर पोलीस स्टेशन , पुणे शहर मोक्याच्या गुन्हयात जामिनावर सुटुन जामिन मुदतीत घरफोडी करणा – या अट्टल चोरटयास अवघ्या दोन दिवसांत चंदननगर पोलीसांनी ठोकल्या बेडया
ONLINE PORTAL NEWS
दिनांक ०१/०७/२०२१ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन हददीत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . १६५/२०२१ भा.द.वि. कलम ४५७,३८०,५११ , ४२७ मधील फोर व्हिलरचा वापर करुन झालेल्या घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पो.शि. ८३७६ अमित कांबळे व पो.ना. ६६१५ नाणेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , दोन दिवसांपुर्वी चंदननगर पोलीस स्टेशन हददीत झालेल्या घरफोडीतील एक आरोपी हा मांजरी खुर्द भागात येणार असुन त्याने अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे . वगैरे मजकुराची बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने विखरून सापळा रचुन बातमी मधील वर्णनाचा आरोपीचा शोध घेत असताना त्यांना वरील वर्णनाचा आरोपी दिसुन आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफिने पकडुन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी , वय ४५ वर्षे , रा . ७२ नं . पाण्याचे टाकी जवळ , मांजरी बुद्रुक , ता . हवेली . जि . पुणे असे असल्याचे सांगुन त्याने व त्याचे साथीदार
२ ) पापासिंग दयालसिंग दुधाणी रा.बिराजदार नगर , गल्ली नं . ६ हडपसर पुणे
३ ) पिल्लूसिंग उर्फ जयसिंग कालूसिंग जुनी रा.सदर यांचे सह दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केला असुन आरोपी अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी याचे कडुन दाखल गुन्हयातील एकुण २७.१५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक चांदिचे बिस्कीट असा मुददेमाल दाखल गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आलेले आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
अटक आरोपी १ ) अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी , वय ४५ वर्षे , रा . ७२ नं . पाण्याचे टाकी जवळ , मांजरी बुद्रुक , ता . हवेली . जि . पुणे ,
२ ) पापासिंग दयालसिंग दुधाणी रा.बिराजदार नगर , गल्ली नं . ६ हडपसर पुणे
३ ) पिल्लूसिंग उर्फ जयसिंग कालूसिंग जुनी रा.सदर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन आरोपी अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी याचेवर सन २००३ पासुन पुणे शहर हददीतील वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने त्याचे वर तळेगाव ढमढेरे , पुणे येथे यापुर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती .
ONLINE PORTAL NEWS
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.नामेदव चव्हाण , पूर्व प्रादेशिक विभाग पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , परि . – ४ , श्री . पंकज देशमुख , मा.सहा.पोलीस आयुक्त , येरवडा विभाग , श्री.किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक , गुन्हे , सुनिल थोपटे , सहा.पोलीस निरीक्षक गजानन जाधव , पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ , सहा.पो.फौजदार युसुफ पठाण , पो.हवा . पंकज मुसळे , पो.ना. तुषार भिवरकर , महेश नाणेकर , श्रीकांत शेंडे , सचिन कळसाईत , पोलीस अंमलदार अमित कांबळे , सुभाष आव्हाड , विक्रांत सासवडकर , यांनी केलेली आहे .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526