Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

एम.डी.ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक, ४ कोटी रूपयांच्या अमली पदार्थासह तिघांना अटक;apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल चार कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहर परिसरात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी पुणे शहर परिसरात ड्रग्स प्रकरणी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

दिनांक १९/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, त्यांचेकडील अधिकारी व अंमलदार असे रात्रीचे वेळी हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, २७६, सोमवार पेठ, पुणे चे समोर एक पांढरे रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ यामध्ये ड्रायव्हींग सिटवर एक इसम बसलेला दिसला व त्याचे शेजारच्या सिटवर पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने रा. पुणे हा बसलेला दिसला. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील असल्याने व त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे बातमी प्राप्त झाली.त्याप्रमाणे युनिट-१ कडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी जावुन चौकशी केली असता त्यांचे बोलणे अधिक संशयास्पद वाटल्याने त्यांची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांचे कब्जात रेकॉर्डवरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने याचे कब्जात किं रु १,००,००,०००/- चा ५०० ग्रॅम इतके वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने रेकॉर्ड वरील आरोपी वैभव उर्फ पिंटया भारत माने व कार चालक नामे अजय आमरनाथ करोसिया वय ३५ वर्ष रा. पुणे यांना जागीच ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही आरोपींकडे कसुन चौकशी केली असता वैभव उर्फ पिंटया भारत माने यास सदरची एम डी देणारा इसमाचे नाव हैदर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे याने काही वेळा पुर्वी दिल्याचे सांगीतल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार त्यांच्या एकुण ५ टिम्स विश्रांतवाडी भागात विविध ठिकाणी रवाना केल्या असता हैदर नुर शेख, वय-४० वर्षे रा. विश्रांतवाडी, पुणे हा विश्रांतवाडी परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात १,००,००,०००/- किं रू क्रिस्टल पावडर स्वरुपातील ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्याच प्रमाणे त्याचे झडतीमध्ये एक चावी मिळून आली त्याबाबत त्याचेकडे अधिक तपास करता सदरची चावी ही त्याचे विश्रांतवाडी, परिसरात असलेल्या एक पत्र्याचे गोडाऊनची आहे असे सांगितल्याने सदर ठिकाणी गोडाऊनची पहाणी केली असता त्यामध्ये १,५०,००,०००/- रू किं चे ७५० ग्रॅम वजनाचे एमडी गोडाऊनमध्ये मिळून आले त्याच प्रमाणे सदर ठिकाणी २०० ते ३०० संशयास्पद पोती मिळून आली असून त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले आहे. परंतु सर्व पोत्यांमध्ये एम.डी. आहे किंवा नाही याबाबत गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपासणी करीत आहेत.ताब्यातील इसम नामे हैदर नुर शेख यांचेकडे नमुद मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाकडुन आणला ? याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचा एमडी अंमली पदार्थ हा परदेशी नागरीक यांनी मला विक्रीकरिता दिला असल्याचे सांगितले. सदर आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने रा. पुणे व अजय आमरनाथ करोसिया रा. पुणे यांचे ताब्यात किं.रु.१,००,००,०००/- चे ५०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन अंमली पदार्थ, किं.रु.२,०००/- रोख रक्कम, किं.रु.००/- ची एक प्लॅस्टिकचे मोकळे बॉबीचे पॅकेट, कि.रु.२००/-ची स्पोर्टस् बॅग, किं.रु.१५०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट, एक आधार कार्ड व किं.रु.८,००,०००/-ची एक इर्टीका कार असा एकुण किं. रु.१,०८,१७,२००/- चा ऐवज मिळून आलेला आहे,

त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रूपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ३ ड्रग्स तस्करांना देखील अटक केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्यांच्या खबरीमार्फत माहिती मिळाली होती की, मोठ्या प्रमाणावर एमडी हा ड्रग पुण्यामध्ये येणार आहे.त्यानुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास ४ कोटी रूपयांचे २ किलो एमडी जप्त केले आहे. ही मोठी कारवाई केल्यानंतर पोलिस सखोल तपास करत आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास करत आहेत. दरम्यान, याआधी ललित पाटीलकडून वेगवेगळे ड्रग्स आणले जात होते. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतलं. त्यानंतरही अशा प्रकारे ड्रग्स आणले जात होते, त्यापैकी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे.

यातील ३ अटक आरोपीपैकी १. वैभग ऊर्फ पिटया माने २. हैदर शेख हे पुणे पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री प्रविण पवार, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे श्री शैलेश बलकवडे मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे श्री अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे श्री सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे श्री सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट ०१, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनिता हिवरकर, विनायक गायकवाड, सपोनि बाबर, गायकवाड, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे, अभिनव लडकत, दता सोनावणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकात दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *