पुणे शहरातील ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’च्या मनमानी कारभाराला पोलिसांनी कडक नियम लावला,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : शहरातील ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’च्या मनमानी कारभाराला पोलिसांनी चाप लावला असून नियमांच्या कडक अमलबजावणी करिता कलम १४४ चे निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम १४४ अंतर्गत मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या असून नियमभंग केल्यास कडक कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेल्स यांनी त्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच आस्थापना सुरू ठेवल्या पाहिजेत. त्यांनी वेळेची मर्यादा ओलांडू नये. रात्री दीड नंतर कोणतेही हॉटेल अथवा ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ सुरू राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. ‘आऊटसाईड’ स्पीकरला रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असून त्यांचे उल्लंघन केले जाऊ नये. रूफ टॉप हॉटेलमध्ये मद्य विक्रीची परवानगी नसताना देखील मद्य विक्री केली जात असेल तर कारवाई केली जाणार आहे. याठिकाणी विना परवाना मद्यविक्री होणार नाही याची दक्षता घेतली जावई. यासोबतच ज्या वयोगटामधील नागरिकांना मद्य पिण्यास परवानगी आहे त्यांनाच मद्य विक्री केली जावी.
जर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी डीजे, कलाकार, विदेशी कलाकार येणार असतील तर त्याची १५ दिवस आधी सविस्तर माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तिकीट लावून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती पोलिसांना मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’ हॉटेलमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. या सीसीटीव्हीसाठी दोन डीव्हीआर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच आतमध्ये ‘स्मोकिंग’साठी स्वतंत्र जागा ठेवणे आवश्यक असल्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. हे आदेश १५ दिवसांकरिता लागू करण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in