Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ची कामगिरी,अंमली पदार्थाची विक्री करणारे आरोपीला केली अटक,३३० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण ६०,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ची कामगिरी,अंमली पदार्थाची विक्री करणारे आरोपीला केली अटक ,.३३० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण ६०,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन,apcs.in

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थांवर थेट कारवाईचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने शहरातील भागात छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एमडी) मिळून आले. 

दि.२२/०२/२०२४,मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना मिळुन आल्याने आवळल्या मुसक्या “

२ दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ जणांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. 

मार्केटयार्ड पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, वय- २८ वर्षे, व्यवसाय- रिक्षा चालक, रा- स.नं. ५७०, गल्ली नं. ०५, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे सध्या रा. गौसुरवाला मस्जीद शेजारी, आश्रफनगर -५ कोंढवा पुणे याने आंबेडकरनगर परीसरात एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी स्वतःचे ताब्यात मिळुन आल्याने त्यास मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे अटक केली आहे.

त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केटयार्ड पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, चेक करणेकामी मा. वपोनि सो, यांचे दिमतीत तपास पथकातील सपोनि कांबळे, पोना ७५५४ जाधव, पोअं ८४४३ चव्हाण, पोअं २३९२ यादव, पो.अ.८२३५ गायकवाड यांचेसह रात्री १९/०० वा खाजगी वाहनाने मार्केटयार्ड पो.स्टे च्या हाद्दीत रवाना झालो. आम्ही आपापले वाहनाने मार्केटयार्ड मधून रिक्षा स्टॅन्ड येथे पेट्रोलींग करीत जात असताना आम्ही आमचे व सर्व पोलीस स्टाफचे वाहन हे रिक्षा स्टॅन्ड येथे बाजुला पार्क करुन चालत चालत दि.२०/०२/२०२४ रोजी १९.१५ वा चे सुमारास गल्ली नं.१ च्या समोर, आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे येथे आलो असता, मारुती मंदिरा समोर पत्र्याचे बाजुला एक इसम संशयास्पदरित्या बसलेला दिसून आला. नमुद इसम अंधारात का बसलेला आहे हे पाहणे करीता आम्ही त्याचे जवळ जात असता रेकॉर्डवरील शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, असा दिसला, त्यांची व आमची नजरा नजर झाली असता तो आम्हास पाहुन पळून जात असता. त्यावेळी आम्ही थोड्याच अंतरावर रेकॉडवरील आरोपी नामे शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबुब खान, यास पकडले त्यावेळी सपोनि कांबळे यांनी त्यास तु का पळून जात होतास असे विचारले असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली.

त्यानंतर सपोनि कांबळे यांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता, ओ सदर ठिकाणी एम.डी. हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचे सांगीतले असुन शाहरुख ऊर्फ चाग्या मेहबुब खान, याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे जवळ ३.३३० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण ६०,०००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (च) गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि कांबळे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री अमितेष कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री प्रविण पवार साो, मा.सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री मनोज पाटील साो, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री आर. राजा सो, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री गणेश इंगळे सो, मा. सहा पोलीस आयुक्त वानवडी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने तपास पथकाचे सपोनि मदन कांबळे, सोबत पोना ७५५४ जाधव, पोअं ८४४३ चव्हाण, पोअं २३९२ यादव, पो.अ.८२३५ गायकवाड यांनी केली आहे.

(स्वप्नाली शिंदे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पो.स्टे. पुणे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *