Breaking NewsPMC NewsTraffice Police

कोंढवा खुर्दमध्ये कथित बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ; पीएमसी कारवाईनंतरही बिल्डरचे काम सुरूच,पत्रकारांना धमक्या देत दबाव टाकण्याचेही आरोप??apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्दमध्ये कथित बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ; पत्रकारांना धमक्या देत दबाव टाकण्याचेही आरोपपुणे :

कोंढवा खुर्द परिसरात बांधकाम व्यावसायिक नवनीत माने यांच्याकडून कथितपणे बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिसरातील अनेक ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून बांधकामे सुरू असून, पुणे महानगरपालिकेच्या कारवाईनंतरही कामे सुरूच असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुणे महानगरपालिकेने यापूर्वी नवनीत माने यांच्या दोन ते तीन इमारतींवर कारवाई केली होती.

मात्र, त्यानंतरही बांधकामे थांबलेली नसून “बिंदासपणे” काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या बांधकामांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच, गेल्या दहा वर्षांत संबंधित बिल्डरने किती बेकायदा बांधकामे केली आहेत, याची चौकशी करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

याशिवाय, या प्रकरणात पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा मागील काही वर्षांचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासावा, अशी मागणी होत आहे.दरम्यान, या कथित बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर दबाव टाकला जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही पत्रकारांना “खंडणीच्या गुन्ह्यात अडकवू”, “गुंडांकडून धमक्या देऊ” तसेच पोलीस स्टेशनचा आणि भाईगिरीचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्रकारांनी बेकायदा कामांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना धमकावून गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही सांगितले जात आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारे पत्रकारांवर दबाव आणला जात असेल तर स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारिता कशी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. पत्रकारांना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोंढवा परिसरात वाढत्या बेकायदा बांधकामांमुळे पार्किंग, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कमी दरात फ्लॅट विक्री करून नागरिकांना आकर्षित केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.आता या संपूर्ण प्रकरणात पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे कोंढवा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *