येरवडा जेलमध्ये झालेला वाद इसमाच्या जिवावर बेतला खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकणाऱ्याला धाडले तुरुंगात लोणंद पोलिसांचा कौतुकास्पद तपास

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

येरवडा जेलमध्ये झालेला वाद इसमाच्या जिवावर बेतला
खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकणाऱ्याला धाडले तुरुंगात
लोणंद पोलिसांचा कौतुकास्पद तपास

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

सातारा – येरवडा जेलमध्ये झालेल्या वादातून इसमाचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकणाºयाला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तुरुंगात धाडण्यात आले. सदर कारवाई लोणंद पोलिसांनी केली. अटक करण्यात आलेला आरोपी यापूर्वीही खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी वाठार बुद्रुक ता. खंडाळा गावातील निरा उजवा कॅनॉलमध्ये एका इसमाचा विवस्त्र मृतदेह आढळून आला. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान मृत इसमाचे नाव मंगेश सुरेंद्र पोमण (३५, रा. पोमणनगर पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे स्पष्ट झाले. मंगेश याचा खून करणाºयाचा शोध सुरू असताना पोलिसांनी काही तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. त्यात हाती लागलेल्या माहितीनुसार लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे तपासी पथक तात्काळ पुण्यात दाखल झाले. पुण्यातील पंगारे, ता. पुरंदर येथे पोलीस आल्याची भणक लागताच वैभव सुभाष जगताप (२८) याने मोटारसायकलवरून पळ काढला. तपासी पोलीस पथकाने जगताप याचा पाठलाग करून डोंगराळ परिसरात त्याच्या मुसक्या आवळल्या. जगताप याची कसून चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ न तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल करू लागला.
चौकशीदरम्यान, पोलीस उपविभागीय तानाजी बरडे यांनी आपल्या कौशल्याने संशयित आरोपी वैभव जगताप याची चौकशी केली असता त्याने मंगेशचा खून केल्याची कबुली दिली. मंगेश व आरोपी वैभव हे दोघेही काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी वैभव याने कारागृहाबाहेर येताच मंगेशचा खून करून त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला. पोलिसांच्या हाती पुरावा लागू नये म्हणून त्याने मंगेशचे कपडे काढले होते. मात्र लोणंद पोलिसांनी उत्कृष्टरीत्या गुन्ह्याची उकल करून कायम सतर्क असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
या गुन्ह्याचा उलगडा सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैकत सिकिलकर, देवेंद्र पाडवी, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, अंकुश इवरे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्वरर मुळीक, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, विठ्ठल काळे, फैयाद शेख, अमोल पवार, शशिकांत गार्डी, गोविंद आंधळे, केतन लाळगे, महिला पोलीस अंमलदार प्रिया दुरगुडे, पोलीस अंमलदार (चालक) मल्हारी भिसे, शिंदे आदी पोलीस पथकाने केला.

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *