Crime NewsLatest NewsPolice News

कोंढवा भाग्योदयनगर येतून ४० लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्त ! घरातून करत होता विक्री,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक 06/09/2024
कोंढव्यातुन 202 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थासह एक जण ताब्यात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ची कामगिरी .

मा.पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पो उप आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 01 पुणे शहर श्री. गणेश इंगळे यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती काढुन कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत.

https://youtube.com/shorts/UwSFqUBw0Wk?si=uUiciM0V4Xlge7SU


वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचना नुसार मा. सहा. पो. आयुक्त,गुन्हे 1 श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक 01 कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ ने दिनांक 06/09/2024 रोजी कोंढवा पो स्टे चे हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना कोंढवा भाग्योदयनगर येथील एका घरातून एम डी या अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकून ४० लाख रुपयांचा २०२ ग्रॅम एम डी (मॅफेड्रॉन) जप्त केला आहे. त्याचबरोबर या तरुणाकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विक्री करणार्‍यांकडून शस्त्र जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.

समीर शरीफ शेख रा. सय्यद काझी हाईटस कोंढवा, भाग्योदयनगर लेन नं. 30,कोंढवा पुणे. हा त्याचे राहते घरातुन एम.डी.(मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी त्याबाबत वरिष्ठांना कळविले असता, वरिष्ठांनी त्याबाबत कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ यांनी सय्यद काझी हाईटस भाग्योदयनगर,गल्ली नं. 30,कोंढवा पुणे येथे सापळा रचुन समीर शरीफ शेख वय 22 वर्षे रा. फलॅट नं 604, 6 वा मजला , सय्यद काझी हाईटस, भाग्योदय नगर गल्ली नं . 30,मक्का मश्जिद जवळ कोंढवा पुणे.

https://www.instagram.com/reel/C_lp3_Huv1i/?igsh=YTV3c2NpYzZxaTk5

यास ताब्यात घेवुन त्यांची घर झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण किं. रु. 42,26,500/- चा ऐवज त्यामध्ये किं.रु. 40,40,000/- चा 202 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ, किं.रु.25,000/- चा एक स्टिलचा गावठी कट्टा, 80,000/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, असा असलेला ऐवज व एम.डी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला असल्याने नमूद आरोपी यांचे विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालु आहे.


वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पो उप आयुक्त, गुन्हे श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे 01 पुणे शहर श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, उत्तम संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते, रेहाना शेख व कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार यांनी केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

      

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *