नागरीक अधिकार मंचच्या अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या कोंढवा खुर्द आंदोलन .
ACS POLICE CRIME SQUAD
अर्धवट रस्ता लवकर पुर्ण करण्यासाठी नागरिक अधिकार मंचाचे कोंढव्यात आंदोलन,
नगरसेवकानी गाजावाजा करून सुरू केलेले काम काम अर्धवट का?
प्रतिनिधी, कोंढवा येथील नगरसेवकांकडून मोठ्ठा गाजावाजा करून रस्त्याचे चालू तर करण्यात आले मात्र काही दिवसांनंतर काम अर्धवट राहिल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रभाग क्रमांक २६ कोंढवा खुर्द कौसर बाग लाईफलाईन हॉस्पिटल समोरील रस्त्याचा काम मागील २५ दिवसांपासून अर्धवट अवस्थेत बंद पडला असून रस्त्याचं काम ताबडतोब चालू करण्यात यावं नागरीक अधिकार मंचाचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतूरत्वा खाली नागरीकांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.
कोंढवा कौसर बाग येथील दोन डीपी रोडला जोडणारा हा रस्ता आहे सदर ठिकाणी जास्त प्रमाणावर रहदारी असते पुणे महानगरपालिका तर्फे सदर ठिकाणी नोव्हेंबर मध्ये गाजा वाजा करून रस्त्याचे कामाचा उदघाटन करून काम चालू करण्यात आलं होतं. परंतु रस्त्याचे काम अर्धवटच करून अर्धा रस्ता तसाच खरडून ठेवलं आहे.
आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याठिकाणी फिरकले सुद्दा नाही. सदर ठिकाणी रस्त्यावर राडारोडा पडलेला असून ड्रेनेजचे झाकण वर खाली झाल्याने अपघात घडत आहे. सदर ठिकाणी हॉस्पिटल, शाळा असून लहान मुलं महिला जेष्ठ नागरिकाचा वावर जास्त प्रमाणात आहे.
पुणे मनपाला वारंवार विनंती करून देखील या ठिकाणी पुणे मनपा कडून सरासर दुर्लक्ष होत आहे. सदर ठिकाणी रस्त्याचा काम पूर्ण का करण्यात येत नाहीये असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
राहिवाश्याचा मागणी नुसार सदर ठिकाणी मंचच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येत्या ४ दिवसात सदर ठिकाणी जर रस्त्याचे काम चालू करण्यात आले नाही तर नागरिक अधिकार मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी दिला आहे.
अध्यक्ष समीर शफी पठाण
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad