मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या आरोपीला कोंढवा पोलिसांनी केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस हवालदार निलेश देसाई व पोलीस नाईक जोतिबा पवार.यांची कामगिरी.
दिनांक. १५/०२/२०२३
दीड वर्षापूर्वी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर टोळी प्रमुख वृषभ रामदास शेवाळे (वय-24 रा. ऊरुळी देवाची, शेवाळवाडी) हा फरार झाला होता. अखेर कोंढवा पोलिसांनी आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातील चांदा गावातून बेड्या ठोकल्या आहेत.आरोपी वृषभ शेवाळे व त्याच्या साथीदारांवर 2021 मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात 302, 307, 326, 324, 323, 120(ब), 141, 143, 144, 147, 149, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता.
मोक्का गुन्ह्यात मागील दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी वृषभ शेवाळे हा अहमनदर जिल्ह्यातील चांदा गावात राहत असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस हवालदार निलेश देसाई व पोलीस नाईक जोतिबा पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार / निलेश देसाई, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस नाईक / गोरखनाथ चिनके व पोलीस नाईक / जोतिबा पवार असे वरिष्ठांच्या परवानगीने तसेच मार्गदर्शनाखाली त्यानुसार पथकाने चांदा या गावात जाऊन आरोपी रात्री झोपेत असताना त्याला शिताफीने पकडले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्री विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पौर्णिमा तावरे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., श्री संतोष सोनवणे, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / निलेश देसाई, पोहवा / सतिश चव्हाण, पोना / गोरखनाथ चिनके, पोलीस नाईक / जोतिबा पवार, पोअं / सुजित मदन, पोअं / बनसुडे, पोअं / ज्ञानेश्वर भोसले, व पोअं/ लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad