जबरदस्तीने मोबाईल फोन व स्मार्ट वॉच चोरी करणा-या गुन्हेगारांना विमानतळ तपास पथकाने केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
. १८/०२/२०२३
जबरदस्तीने मोबाईल फोन व स्मार्ट वॉच चोरी करणा-या गुन्हेगारांना विमानतळ तपास पथकाने केली अटक.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत नगर रोडवरील हॉटेल मराठा दरबार चे समोर पुणे येथे फिर्यादी नामे प्रदिप शहाजी जगताप वय २६ वर्षे धंदा फोटोग्राफर रा. वाघोली पुणे हे जेवण करण्यासाठी आले असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे खिशातील मोबाईल फोन व हातातील मनगटी घडयाळ जबरीने काढुन घेवुन जबरीने चोरुन नेलेबाबत अनोळखी इसमांविरुध्द दिनांक १७/०२/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपींतांचा विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथक पोलीस ठाणे हददीत शोध घेत असताना पोलीस अंमलदार योगेश थोपटे व गिरीष नाणेकर यांना सदरचे आरोपी हे मंत्री आय टी पार्क चे बाजुला असलेले मोकळे मैदानात पुणे नगर रोड सिगारेट पित बसलेले असले बाबत बातमी मिळाली होती. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. रविंद्र ढावरे पोलीस उप निरीक्षक यांना सदरची माहिती दिली असता त्यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास सोंडे यांना कळविली असता शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस उप निरीक्षक ढावरे यांनी तपास पथकातील स्टाफसह यातील आरोपी यांना सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेतले असुन त्यांची नावे १) अमित प्रकाश इंगोले वय १९ वर्षे रा. लेन नं ४ पठारे मळा खराडी बायपास जवळ खराडी पुणे २) सागर सुनिल सांगडे वय २१ वर्षे रा. लेन नं २ पठारे मळा खराडी बायपास जवळ खराडी पुणे असे असल्याचे सांगितले अशी आहेत, त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचे ताब्यातुन जबरीने चोरलेला फिर्यादी यांचा मोबाईल फोन व मनगटी घड्याळ हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री. रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये श्री विलास सोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्रीमती संगीता माळी पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे नाना कर्चे, योगेश थोपटे, दादा बर्डे यांचे पथकाने केली आहे.
( विलास सोंडे ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे पुणे शहर
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad