कोंढवा पोलिस स्टेशनचे महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

शहर कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी ५० हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हर्षदा बाळासाहेब दगडे असे महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यासह पोलिस कर्मचारी अभिजीत विठ्ठल पालके यांच्यावर ५० हजार रूपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियावर दाखल असलेल्या गुन्हयाच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदार (फिर्यादी) यांच्या आई-वडिल आणि बहिणीला अटक न करण्यासाठी पोलिस कर्मचारी पालके यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षदा दगडे यांच्यासाठी तडजोडीअंती ५० हजार रूपयाची मागणी केली. त्यास एपीआय दगडे यांनी लाच मागण्यासाठी मदत केली. त्यामुळे अ‍ॅन्टी करप्शनकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर ,
कर्मचारी वैभव गोसावी, रियाज शेख, पूजा डेरे, चालक दीपक दिवेकर, पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली
आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *