रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त.वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
प्रेस नोट दि . १९ /१०/ २०२२ – : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
भाईकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५ काडतुसे जप्त : वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी.
वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या कामगिरीमुळे हद्दीतील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे.
वानवडी पोलीस स्टेशनची कामगिरी पुणे शहरातील सराईत गुन्हेगार व त्यांचे कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मा .पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी चालु केलेल्या मोहीमे अंतर्गत सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून , त्यांचे बेकायदेशीर कृत्यास तत्काळ प्रतिबंध करुन ,त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करुन ,गुन्हेगारी समुळ नष्ट करण्याचे काम सुरु आहे .त्याअनुशंगाने वानवडी पोलीस ठाणेकडील सहा.पोलीस निरिक्षक जयवंत जाधव व पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख , राहुल गोसावी ,निळकंठ राठोड ,संदीप साळवे , अमोल गायकवाड हे वानवडी पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयामधील अटक आरोपीकडे तपास करीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार .
नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे ,रा .कोंढवा खुर्द , पुणे याचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असलेबाबत माहीती मिळाली .
त्याअनुशंगाने वानवडी पोलीस ठाणेकडील टिम सदरबाबत माहीती काढत असताना त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , ओमकार कापरे हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन तो नेहमी सशस्त्र असतो तसेच तो जे.एस.पी.एम. कॉलेज परिसर येथे येणार आहे .अशी बातमी मिळाल्याने सपोनि जयवंत जाधव यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळवुन वरिष्ठांचे परवानगीने तपासपथकातील स्टाफसह जे.एस.पी.एम. कॉलेज रोड , काळेपडळ , हडपसर , पुणे येथे जावुन दोन टिम करुन सापळा रचुन थांबले असता , बातमीतील वर्णनाचा इसम व त्याचे सोबत आणखी एक इसम तेथे अहिल्यादेवी होळकर चौकाकडुन वैष्णवसिटी कडे जाणारे रोडने फुटपाथने चालत येताना दिसले त्यावेळी त्यांना अत्यंत शिताफीने जागीच पकडुन त्यांना प्रथम त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे
१ ) ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे , रा . घर नं .०१ , संत गाडगेबाबा शाळेसमोर , लक्ष्मी निवास , कोंढवा खुर्द पुणे व
२ ) मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे , रा . झांबरे तालीम संघ , गणेश मंदिराजवळ , होळकरवाडी , ऊरुळी देवाची , पुणे
अशी असल्याची सांगीतले . त्यावेळी त्यांची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेता आरोपी नामे ओकेभाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे याचे कमरेचे पाठीमागे पॅन्टमध्ये खोसलेले एक अग्नीशस्त्र मिळून आले . त्याचे मॅगझीन चेक केले असता त्यात ५ जिवंत काडतुसे देखील मिळुन आली . ते त्यांचेकडुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आलेले असुन यातील
आरोपी क्र . २ मनिष ऊर्फ आकाश मारुती झांबरे यास ओमकार कापरे याचेकडे पिस्टल व काडतुसे असल्याचे माहीती असुन व ते जवळ बाळगणे हे बेकायदेशीर असल्याचे व त्याबाबत गुन्हा दाखल होवु शकतो हेही माहीती असताना त्याने सदरबाबत पोलीसांना खबर न देता , माहीती लपवून ठेवली . म्हणुन आरोपी ओमकार कापरे व आकाश झांबरे यांचेविरुध्द पो.ना .देशमुख यांनी फिर्यादी दिली असुन त्यांचे दोघांविरुध्दही वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४३५ / २०२२ भारतीय शस्त्र अधि कलम ३ ( २५ ) , ३५ महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ ( १ ) सह ९३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन दाखल गुन्हयात नमुद आरोपीतांना अटक करण्यात आलेले आहे .
तसेच त्यांचेकडे उकृष्टरित्या तपास करुन त्यांचेकडील अंदाजे ९०० / -रु . किंमतीच्या एस एस मटेरिअलच्या दोन धारदार तलवारीही जप्त करण्यात आलेल्या आहेत .
सदरची कारवाई ही श्री . नामदेव चव्हाण सोो , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग , पुणे शहर , श्रीमती . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त सोो , परिमंडळ ०५ पुणे शहर , श्रीमती पौर्णिमा तावरे , सहा . पोलीस आयुक्त सोो , वानवडी विभाग , पुणे शहर व श्री दिपक लगड , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , वानवडी पो . स्टे . पुणे शहर व संदिप शिवले पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , वानवडी पो . स्टे . पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा . पोलीस निरीक्षक , जयवंत जाधव , पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले व पोलीस अंमलदार संतोष तानवडे , अमजद पठाण , संतोष काळे , संतोष नाईक , अतुल गायकवाड , विनोद भंडलकर , महेश गाढवे , सर्फराज देशमुख , राहुल गोसावी , निळकंठ राठोड , संदीप साळवे , अमोल गायकवाड , विष्णु सुतार व विठ्ठल चोरमले या विशेष पथकाने केली आहे . सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांची धडाकेबाज कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad