सराईत घरफोडी करणारा आरोपी २४ तासात अटक .

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक २७/१०/२०२१ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर ” सराईत घरफोडी करणारा आरोपी २४ तासात अटक ”

कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन.९३२ / २०२१ भादवि कलम ४५४,४५७,३८० घरफोडीचा गुन्हा दाखल आहे . दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपी हयाचा मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सरदार पाटील , व पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री जगन्नाथ जानकर यांनी केलेल्या सुचनाप्रमाणे शोध तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक , पी . यु . कापुरे , तपास पथक अंमलदार सहा पोलीस फौजदार , सैय्यद , दिपक जडे , अमोल हिरवे , योगेश कुंभार , गणेश चिंचकर , अभिजीत रत्नपारखी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत होतो . सदर गुन्हा हा आरोपी कौसर अफसर सैय्यद , वय २१ वर्षे , रा . नवाजीश पार्क माविया मस्जिद शेजारी , कोंढवा खुर्द , पुणे याने केली असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार असगरअली सैय्यद , दिपक जडे , अमोल हिरवे यांना प्राप्त झाली . सदर मिळालेल्या बातमीवरुन त्याचा शोध घेत असताना तो संन्डे बाजार मैदानात येथे कोणास तरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली . मिळालेल्या बातमीवरुन त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत १,०४,००० / – रुकिचे सोन्याचे दागिणे मिळुन आले . त्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने मक्का टॉवर साईबाबा मंदिराशेजारी ग.नं. ९ साईबाबा नगर कोंढवा पुणे येथुन घराचे कुलूप तोडुन फलॅट मध्ये प्रवेश करुन घरफोडी करुन चोरी केले असल्याचे सांगितले . सदर आरोपी हा घरफोडी करणारा रेकार्डवरिल आरोपी आहे . सदर कामगिरीबाबत मा . पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे . सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ५ , पुणे शहर व सहा पोलीस आयुक्त , वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *