रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक समर्थ पोलिसांची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD
दिनांक २६/१०/२०२१ – समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर “ समर्थ पोलीसांचे सुसाट कामगिरी चालूच ” सराईत वाहन चोराकडून वाहने हस्तगत .
दि .२४ / १० / २०२१ रोजी फिर्यादीने त्यांची अॅटो रिक्षा चोरी झालेबाबत तक्रार दाखल केली होती .
पुणे : कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात सापळा रचून समर्थ पोलिसांनी सराईत वाहनचोरास चोरीच्या रिक्षासह अटक केली . त्याच्याकडून समर्थ , खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून रास्ता पेठ आणि भवानी पेठेतून चोरलेल्या दोन रिक्षा आणि १ दुचाकी अशी तीन वाहने हस्तगत केली आहेत . वसिम वाजिदअली अन्सारी ( वय २९ , रा . भाग्योदयनगर कोंढवा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीला प्रतिबंध होणेकामी व वाहन चोर पकडणेकामी वाहन चेकींग करीत होते . उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व बातमी दारामार्फत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत भाग्योदयनगर येथे जावुन बातमीदाराने दिलेले माहितीनुसार ट्रॅप लावला असताना चोरीस गेलेली रिक्षा नंबर एम . एच . १२ डीजी ८९८० ही घेवुन येताना एक इसम दिसला . त्यास थांबवून तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज मधील इसम व बातमीदाराने दिलेले बातमीतील इसम रिक्षा चोर असल्याची खात्री झाली . त्याचे ताब्यात असलेली रिक्षा ही दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली असल्याची तिच्या आरटीओ नंबरवरून खात्री केली . सदर इसमास विश्वासात घेवून त्याचेकडे दाखल गुन्हयातील चोरीच्या रिक्षाबाबत चौकशी केली असता त्याने सदरची रिक्षा रास्ता पेठ पुणे येथून चोरी केली असल्याची कबुली दिली . त्यास नांव पत्ता विचारता त्याने आपले नांव वसिम वाजिदअली अन्सारी वय २९ वर्ष रा . भाग्योदयनगर गल्ली नं .७ , जमादार बिल्डींग तिसरा मजला , कोंढवा पुणे असे असल्याचे सांगीतले . त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले व त्याला दाखल गुन्हयात अटक करुन विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता , जूना मोटार स्टैंड , भवानी पेठ , पुणे येथून दुसरी रिक्षा चोरी केलेबाबत सांगीतले . सदर बाबत खडक पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची माहिती घेतली असता , तेथे खडक पोलीस स्टेशन गुरनं . ३९१ / २०२१ भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल असलेचे समजले . तसेच त्याने दीड महिन्यापूर्वी भोसरी पोलीस स्टेशनचे हद्दीतून भोसरी उड्डाण पूला शेजारील आळंदी रोड येथील माई वडेवाले या दुकानासमोरून एक होंडा शाईन गाडी चोरी केलेबाबत सांगीतले . सदर बाबत भोसरी पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची माहिती घेतली असता , तेथे भोसरी पोलीस स्टेशन गुरनं . ६१६ / २०२१ भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल असलेचे समजले . अशा प्रकारे वसिम अन्सारी या वाहन चोराकडून दोन रिक्षा आणि एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत . सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक सुभाष पिंगळे हे करीत आहेत . सदरचा आरोपी हा वाहन चोरीतील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी वाहन चोरीचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत .
सदरची कामगिरी ही मा.राजेंद्र डहाळे , मा . अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर , श्रीमती प्रियंका नारनवरे , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ , पुणे शहर , श्री . सतिश गोवेकर , मा . सहाय्यक पोलीस आयुंक्त फरासखाना विभाग , पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विष्णु ताम्हाणे , समर्थ पो.स्टे . पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . उल्हास कदम यांचे मार्गदर्शनानुसार सहा पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस हवालदार , संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , शुभम देसाई , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , हेमंत पेरणे , महेश जाधव , सुभाष मोरे , श्याम सुर्यवंशी , यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526