लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तडीपार इसम दरोडा पथक-२ कडून जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तडीपार इसम दरोडा पथक-२ कडून जेरबंद.

गुन्हे शाखा, दरोडा पथक-२ ची पोलीस अमलदार मनोज खरपुडे ची कामगिरी.

आज दि ०४/०४/२०२२ रोजी गुन्हे शाखा, दरोडा पथक-२ चे पथक लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस अमलदार मनोज खरपुडे यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तडीपार असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार

नामे सौरभ गोविंद इंगळे, वय २२वर्षे रा इराणी मशीद,पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे, हा लोणी काळभोर येथील हनुमान मंदिर जवळ लोणी काळभोर उभा असल्याची बातमी मिळाल्याने त्यांस लागलीच स्टाफच्या मदतिने ताब्यात घेवून त्याचेवर लोणी काळभोर पोलिस स्टेशन गु.र.नं १६५ /२०२२ मुं.पो.अॅक्ट १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीस लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री.नारायण शिरगावकर , यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनिल पंधरकर, पो.उप – निरी.गुगा जगताप ,पोलीस अंमलदार राजेश लोखंडे,दिनकर लोखंडे, मनोज खरपुडे ,मुकुंद पवार , गणेश लोखंडे, अमोल सरतापे यांनी केली आहे.


सुनिल पंधरकर.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दरोडा पथक-२ पुणे शहर.

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *