प्रेमी च्या नादात ने गमावला जीव.
ACS POLICE CRIME SQUAD
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
भंगार गोळा करणाऱ्या महिलेवर जडला जीव, पण ती बोलत नाही म्हणून गमावला जीव,
आपण जिच्यावर प्रेम करतो ती प्रेयसी अनेक दिवसापासून ती बोलायला टाळाटाळ करते ही भावना सहन न झाल्याने, एका प्रियकराने, आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे,
प्रेयसी सोबत फोन सुरू असतानाच त्याने सपासप वार करुन गळफास लावून आत्महत्या केली ही घटना उघडकीस आली आहे,
आकाश मिसाळ,(२२) वर्ष, असे या आत्महत्या केलेल्या, तरुणाचे नाव आहे,,
, आकाश अविवाहित असून तो पेंटर काम करतो, आकाश चे कभी नगर येथील ३८ वर्षीय महिलेशी, प्रेम संबंध होते, तिला सहा मुलं असून ती महिला भंगार गोळा करण्याचे काम करते, आकाशने दारुच्या नशेतच प्रियसी शी फोनवर बोलत, असताना हातावर ब्लेड ने वार करून घेतले, तसेच रात्री घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली, ही बाब सकाळी सहाच्या सुमारास, निर्दशनास आली, नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने आकाशला दवाखान्यात नेले,
तेव्हा डॉक्टरांनी, त्याला मृत घोषित केले,
दरम्यान सदर महिलेने यापूर्वीही अनेक लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आकाश च्या नातेवाईकांनी केला आहे, तिने अनेकांना फसवले पण आमच्या मुलाचा जीव गेला, याप्रकारे कुणाचा जीव जाऊ नये, यासाठी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आकाश च्या आईने केली आहे,
पुणे प्रतिनिधी ,
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526