नारायणगावात खुलेआम अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
नारायणगाव परिसरातील काही लॉजमध्ये खुलेआम अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेषतः “सुवर्ण पॅलेस” लॉजसह काही ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर वेळोवेळी कारवाई होत असली तरी काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण भागातील काही लॉजमध्ये बाहेरील महिलांना आणून हा व्यवसाय चालवला जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांवरही चुकीचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच हा अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाला नाही, तर अँटी करप्शन स्क्वॉड ऑल इंडिया अध्यक्ष वजीद खान यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा अवैध व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून पोलिस प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
