बंदुकीच्या गोळया (काडतुसे) जवळ बाळगणारा व्यापारी ला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक १२ / ०६ / २०२२ – युनिट -१ गुन्हे पुणे शहरची कामगिरी बंदुकीच्या गोळया ( काडतुसे ) जवळ बाळगणारा व्यापारी जेरबंद

एक लाख छप्पन हजार रुपयाचे एकुण ११०५ नग जिवंत व खराब काडतुसे , बुलेट ( लिड ) हस्तगत मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर व मा.पोलीस सह आयुक्त सो पुणे यांनी मा .पंतप्रधान भारत सरकार यांचा पुणे दौरा असल्याचे अनुशंगाने दिनांक ११/०६/२०२ रोजी पुणे शहरात आऊट ऑपरेशन आयोजन करुन अभिलेखावरील गुन्हेगार तडीपार , फरार , पाहीजे आरोपी यांचा शोध घेण्याबाबत तसेच बेकायदेशीर शस्त्रे , अग्निशस्त्रे जवळ बाळगणा – या इसमाबाबत बाबत माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते .

युनिट -१ गुन्हे पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे ऑल आऊट ऑपरेशनच्या अनुषंगाने हददीत पेट्रोलिंग फिरत असताना पोलीसांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , गुरुवार पेठ , गौरी आळी , पुणे येथे भंगारमालाचा व्यवसाय करणा – या व्यापा – याने आपले दुकानात बंदुकीची काडतुसे ठेवलेली आहे अशी खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी त्याठिकाणी सापळा लावुन प्रथम शहानिशा करुन छापा टाकुन भंगारमालाचा व्यवसाय करणारा

इसमनामे दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज वय ३४ रा पर्वती दर्शन जनता वसाहत पुणे मुळगाव मंगलपुर ता कुडा जिल्हा प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश यास

दिनांक ११/०६/२०२२ रोजी रात्रौ ताब्यात घेतले आहे . दुकानातुन ५६ नग जिवंत काडतुसे ,७९ खराब काडतुसे ,९७० नग बुलेट (लिड ) अशी एकुण ११०५ नग काडतुसे / बुलेट ( लिड ) एकुण किंमत रुपये १,५६ ,९०० / ( एक लाख छप्पन हजार नऊशे रुपये फक्त ) चा माल जप्त करण्यात आलेला आहे .

त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन पुणे गुरनं १७३ / २०२२ भारताचा हत्याराबाबत कायदा कलम ३ , २५ , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

आरोपीने एवढ्या मोठया प्रमाणात काडतुसे व बुलेट कोठुन आणल्या आहेत ? ते कशासाठी जवळ बाळगलेले आहे ? यापुर्वी त्याने इतर कोणाला काडतुसे अथवा अग्नीशस्त्रे दिलेली आहेत काय ? याबाबत पोलीस तपास करत आहेत .

मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो न्यायालय क्रंमाक – ९ पुणे यांचे न्यायालयात आरोपीस हजर केले असता मा . न्यायालयाने त्यास दिनांक -१५ / ०६ / २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत .

वपोनि श्री . संदीप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड हे पुढील अधिक तपास करत आहेत . सदरची कामगिरी मा . अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर , मा . संदीप कर्णिक पोलीस सह आयुकत पुणे शहर , मा . रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर मा . श्रीनिवास घाडगे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे मा . गजानन टोम्पे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे १ , पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले , पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , अजय जाधव , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , अय्याज दडडीकर , इम्रान शेख , महेश बामगुडे , तुषार माळवदकर , शुभम देसाई , निलेश साबळे यांनी केली आहे .

(संदीप भोसले) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ गुन्हे , पुणे शहर .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *