भवानी पेठ मधील विशाल सोसायटी मध्ये एक किरकोळ सस्पेकटड ब्लास्ट झाला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे :- पुण्यातील भवानी पेठ मधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भवानी पेठ मधील विशाल सोसायटी मध्ये एक किरकोळ सस्पेकटड ब्लास्ट झाला आहे.यात कोणतीही दुर्घटना झाली नसून पुणे पोलीस याचा तपास करत आहे.

भवानी पेठ येथील विशाल सोसायटीच्या बी विंग बिल्डींग मधील तिसऱ्या मजल्यावर हा संशयित स्पोट झालला आहे. वाशिंग मशीन मध्ये हा  किरकोळ स्फोट झाला आहे. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचे गांभीर्य पाहून भवानी पेठ मधील विशाल सोसायटी मध्ये पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल तसेच बीडीडीएस टीम दाखल झाली आहेत. 

ज्या फ्लॅट मध्ये हा ब्लास्ट झाला. त्या ठिकाणी पोलीस एका व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. हा व्यक्ती नेमका कोण आहे ? आणि तो या फ्लॅट मध्ये काय करत होता ? याविषयी पोलिस त्या व्यक्तीकडे कसून चौकशी करत आहेत.

पुण्यातील भवानी पेठ येथील विशाल सोसायटी येथे दुपारी 3 वाजता राशिद शेख यांच्या विशाल अपार्टमेंट येथील बी विंग मधील 3 ऱ्या मजल्यावरील 306 फ्लॅट मध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये त्या फ्लॅट मधील सर्व काचा तुटल्या आहे.दुपारी 3 वाजता जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा त्यानंतर पुणे शहरातील सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

हा व्यक्ती इलेक्ट्रिकल मकानिकल आहे.तो गेल्या 10 वर्षापासून या सोसायटीत राहत आहे.तो या सोसायटीत गेल्या 10 वर्षापासून एकटाच राहत आहे दरोरोज दुपारी 12 वाजता तो यायचा आणि संध्याकापर्यंत याच ठिकाणी थांबायचा आणि परत तो त्यांच्या बहिणी कडे जायचा.तो एकटाच इथे गेल्या 10 वर्षापासून राहत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुश्ताक अहमद याने दिली.

Byte

मुश्ताक अहमद :- चेअरमन विशाल सोसायटी…

भवानी पेठ येथील विशाल सोसायटी येथे एक जण आपल्या वॉशिंग मशीन ची दुरुस्ती करत होते.त्यात जो गॅस चा ब्लू टॉर्च असतो. त्याचा फ्लो जास्त झाल्याने आज दुपारी त्याचा स्फोट झाला आहे.आणि आम्हाला माहिती मिळताच घटना स्थळी आम्ही त्याची माहिती घेतली.संबंधिताकडे चौकशी सुरू आहे पण सध्या तरी कुठलही संशयाचा प्रकार नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नये.पुढे जर काही संशयाचा प्रकार असेल तर त्याचा तपास पोलीस करत आहे. असं यावेळी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितल आहे.

विष्णू ताम्हाणे :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन…

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *