महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांचे ड्युटीच्यावेळेत कार्यालयात उपस्थित नसलेल्या विभागप्रमुखांना कारवाईचे आदेश,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे |नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा महापालिका आयुक्तांचे सर्व विभागप्रमुखांना आदेश,ड्युटीच्यावेळेत कार्यालयात उपस्थित नसलेल्या व कर्मचार्यांवर कारवाई होणार,
पुणे शहरातील नागरिकांकडून दैनंदिन अडचणी आणि समस्यांबाबत महापालिका, तसेच राज्य शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तक्रारी येतात. मात्र, या तक्रारी प्रलंबित राहात असल्याने महापालिकेची प्रतिमा खराब होत आहे.
ड्युटीच्या वेळेत कार्यालयात हजर नसलेल्या तसेच जेवणाच्या सुट्टीत सुट्टी संपल्यानंतरही कार्यालय सोडून इतरत्र फिरणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. कार्यालयीन वेळेत कामाशिवाय जागेवर नसलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

महापालिकेचे अधिकारी कर्मचारी ड्युटीच्या वेळेत कार्यालयात हजर नसतात. ड्युटीची वेळ सकाळी पावणेदहा ते संध्याकाळी सव्वा सहा अशी असताना अनेकजण उशिरा येतात किंवा लवकर कार्यालयातून बाहेर पडतात. दुपारी दोन ते अडीच अशी जेवणाची सुट्टी असतानाही कर्मचारी बराचवेळ जागेवर नसतात. अनेक कर्मचारी हे इमारतीच्या आवारात अथवा बाहेर फिरताना दिसतात. यामुळे कामानिमित्त येणार्या नागरिकांना अधिकारी व कर्मचारी भेटत नसल्याने मनस्ताप सोसावा लागतो.ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागप्रमुखांनी १५ दिवसांतून एकदा नियमित बैठक घ्यावी, तसेच अतिरिक्त आयुक्तांनी महिन्यातून एकदा याचा आढावा घ्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

आहेत.महापालिका आयुक्त भोसले यांच्याकडून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेतला जातो. या वेळी अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही त्याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याचे गाऱ्हाणे थेट आयुक्तांच्या समोर मांडले आहे. याची गंभीर दखल घेऊन या तक्रारींबाबत खातरजमा करून घेण्यासाठी आयुक्तांनी ही आढावा बैठक घेतली होती.यापुढील काळात कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in