Breaking NewsCrime News

वाहने आणि दुकानाची तोडफोड करून दशहत, हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे, दि. २ फुरसुंगी येथे दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक करून तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले (वय २२, रा. संजुदा कॉम्प्लेक्स, पापडेवस्ती, फुरसुंगी) आणि माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या (वय १९, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत (वय २६, रा. शिवसेना भवनजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे भेकराईनगर येथे शंभू फॉरमेन्स दुकान आहे. दुकानासमोर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्राने दुकानाच्या काचा फोडल्या, दुकानासमोरून जाणार्या बसची काच फोडून, ढमाळवाडी येथील ७-८ वाहनांचे नुकसान केले होते. आरोपींचा तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करीत आहेत.

https://www.instagram.com/reel/C7tGOISRluE/?igsh=MTdyMTM5ODRmMXhvYg==

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षिका (गुन्हे) मंगल मोढवे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *