महानगरपालिकेच्या कर विभागीय निरीक्षक मागितली लाच एसीबीकडून FIR.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
महानगरपालिकेच्या कर विभागीय निरीक्षक मागितली लाच.
मिळकत कर नावावर करुन देण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी ,पालिकेच्या विभागीय निरीक्षकावर एसीबीकडून FIR.
पुणे : ऑनलाइन -ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. : (ACS)
इमारतीचा मिळकत कर तक्रारदार यांच्या नावावर करुन देण्यासाठी आणि जूना मिळकत कर न लावण्यासाठी २० हजार रुपये लाच मागणाऱ्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय धनकवडी येथील कर विभागातील विभागीय निरीक्षकावर पुणे एसीबीने गुन्हा दाखल केला आहे . संजय बबन काळे ( वय ४५ ) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या विभागीय निरीक्षकाचे नाव आहे .पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ( दि .२९ ) ही कारवाई केली .
याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे . त्यानुसार अधिकाऱ्यांनी १४ जुलै आणि २८ जुलै रोजी पडताळणी केली होती . यावेळी विभागीय निरीक्षक काळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले . तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर त्यांच्या नावावर करुन देण्याकरीता व जुना मिळकत कर न लावण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितली . मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली . प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता विभागीय निरीक्षक काळे याने तडजोडीमध्ये २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले . पुणे एसीबीने सोमवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संजय काळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे ) करीत आहेत .
शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचप विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर १०६४ सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad