प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी दिनांक २९,३०,३१ ऑगस्ट २०२२ रोजी विशेष कॅम्प चे आयोजन.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
हवेली तहसील कार्यालयाचे वतीने दिनांक २९, ३०, ३१ ऑगस्ट 2022 रोजी विशेष कॅम्प चे आयोजन.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हवेली पंचायत समितीच्या माध्यमातुन EKYC व डाटा एन्ट्री पीक पाहणी शिबाराचे आयोजन तहसिलदार तृप्ती कोलते यांची माहिती ..
पुणे : हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यामधील ग्रामीण गावांमध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची EKYC व डाटा एन्ट्री , तसेच पीक पाहणी व Epic -Adhar जोडणी याकरिता दिनांक २९ , ३०,३१ ऑगस्ट रोजी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिली आहे .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी (ई केवायसी ) करण्यासाठी हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने .
दिनांक 29 ,30 ,31 ऑगस्ट 2022 रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील ८० गावांमध्ये तलाठी कार्यालय ,ग्रामपंचायत कार्यालय, संग्राम ,केंद्र महा-ई-सेवा केंद्र, चावडी या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महसूल, कृषी ,पंचायत समिती या विभागाकडील अनुक्रमे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यामध्ये वाटून दिलेल्या गावांमध्ये सदर कर्मचारी ही कामे करतील या कार्यालयाकडून गावातील पडताळणी (ई केवायसी ) न केलेल्या लाभार्थ्यांची यादी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी सोसायटी बोर्ड, पतसंस्था, बँक, चावडी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आपली पडताळणी ही (केवायसी) करून प्रशासनास सहकार्य करावे. लाभार्थ्यांनी पडताळणी ( ई केवायसी) न केल्यास 1 सप्टेंबर 2022 नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. संग्राम, केंद्र महा-ई-सेवा केंद्र येथे तसेच लाभार्थी पी एम किसान मोबाईल एप्लीकेशन यावरून व exlink.pmkisan.gov.in वरही घरच्या घरी सदर पडताळणी ही ( ई केवायसी )स्वतः करू शकतात पडताळणी (ई केवायसी) करण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्ड ची लिंक मोबाईल नंबर लाभार्थी यांनी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. याचबरोबर या विशेष मोहिमेत मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे व पीक पाहणी करण्यासाठी मोबाईल ॲप मध्ये पीक पाहणी करणे याचाही कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी हवेली तहसीलदार हवेली यांचे कडून सर्व नागरिकांना सदर उपक्रमांतर्गत देण्यात योजनांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad