पेट्रोलिंग करीत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,ची कामगिरी.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा ,


ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

नेहमी चर्चेमध्ये असणारे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,वाहन चोरीचे प्रकरण लय वाढली असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून शहर कडील पोउपनिरी गुंगा जगताप अंमलदार दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव व गणेश लोखंडे असे वाहनचोरी प्रतिबंधक कारवाईचे अनुषंगाने हडपसर व वानवडी पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पो हवा दत्तात्रय खरपुडे, व पो.ना गणेश लोखंडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली

की वाहनचोरीचे गुन्हे करणारा गुन्हेगार हा श्री लक्ष्मी सोसायटी,इनक्लेव्ह सोसायटी चे गेटजवळ माळवाडी, हडपसर, पुणे येथे एक काळ्या व लाल रंगाचे डिलक्स गाडीवर संशय रित्या बसलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख सुनिल पंधरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमास अत्यंत शिताफीने पकडले व त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव राजकुमार दुर्गा सिंह,वय-२६ वर्षे, रा-खांदवेनगर,वाघोली, पुणे.मुळगांव-डेढावल,कटरी,कौशामबी,उत्तरप्रदेश असे सांगितले त्यांस सी.आर.पी.सी.४१(ङ)प्रमाणे ताब्यात घेऊन

दरोङा विरोधी पथकाचे कार्यालयात आणुन अधिक चौकशीत त्याचे ताब्यातील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले व सदर दुचाकीबाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं १३२७/२०२२ भादवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्याने आणखी २ दुचाकी वाहने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदरची वाहने जप्त कली आहे. आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण ३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) हडपसर पो स्टे गु.र.नं.१३२७/२०२२भादवि क.३७९
२) येरवडा पो स्टे गु.र.नं.५०२/२०२२ भादविक.३७९
३) चंदननगर पो स्टे गु.र.नं. १५१/२०२२ भादविक.३७९

वरील प्रमाणे किंमत रुपये ७५,००० ची किंमतीची ३ दुचाकी वाहने आरोपी कडून जप्त केली आहे . आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आले आहे .

सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शना खाली पो.उपनिरी गुंगा जगताप व पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव गणेश लोखंडे व सुदेश सपकाळ यांनी केली आहेआहे.

सुनील पंधरकर पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *