Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

चोरीच्या गुन्ह्यात दाखल न करण्यासाठी चक्क पोलिसांनी मागितली लाच,,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

लाचखोरीचे प्रमाण वाढत असून विविध शासकिय निमशासकीय कार्यालयात लाच घेणारे वाढत आहे, कसलीच भीती न भाळगता खाजगी पंटर नेमून लाखो, हजारो रुपये लाच स्वीकारले जाते, याबाबतीत आशा अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करायला हवी, असे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पगारापेक्षा जास्त इनकम बाहेरून होतो, त्याचा शोध घेऊन अथवा माहिती घेऊन चौकशी व्हावी तरच कुठेतरी भ्रष्टाचार थांबण्यास काहीतरी फरक पडेल, नुकतीच अशी घटना चतुर्शिंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे ,

थोडक्यात माहिती यातील तक्रारदारांच्या आतेभावाचे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगून चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रशांत जाधव व अजित गायकवाड यानी,५०,०००/- रूपये लाचेची मागणी,होती

याप्रकरणी, प्रशांत विठ्ठल जाधव, पोलीस हवालदार, व अजित शांताराम गायकवाड, असे अटक केलेल्या पोलीस शिपाई यांचे नाव आहे,

परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी यांची तक्रार पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली, विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पंचसमक्ष पडताळणी केली, असता,पोलीस हवालदार व पोलीस शिपाई सलग्न वाहतूक विभाग, चतुर्शिंगी विभाग यांनी लाच स्वीकारल्याचे कबूल केले,

थोडक्यात माहिती,,,,,तक्रारदार यांच्या आतेभावाचे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरीता तक्रारदार यांचेकडे सुरूवातीस ५०,०००/- रूपये लाच मागणी करून तडजोडीअंती २५,०००/- रूपये लाचेची मागणी करून आरोपी लोकसवेक क्रमांक 1 प्रशांत विठ्ठल जाधव, पोलीस हवालदार चतुर्शिंगी पोलीस स्टेशन, व अजित शांताराम गायकवाड, यानी लाच रक्कम स्वीकारली असता त्या दोघांना अटक करण्यात आले असून त्यांना मा. विशेष न्यायालय, पुणे येथे हजर केले असता त्यांना दिनांक ०९/११/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

ही कारवाई, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे, पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली,

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *