Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

परिमंडळ ५ शोध पथकांची कामगिरी .गंभीर गुन्हयातील एकूण ५ पाहिजे/फरारी आरोपी १२ तासात केले अटक.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ऑनलाईन पुणे :-(ACS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पुणे शहरांतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे अभिलेखांवर वर्षानुवर्षे पाहिजे व फरारी असलेले आरोपींची संख्या जास्त असून त्याचा शोध घेवून त्याचेवर अटकेची कारवाई होणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत आदेशित केलेले होते. त्यानुसार पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे अधिपत्याखालील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडील वरील कामगिरी करणारे निवडक व माहीतगार अंमलदार यांचे नेमणूक करून परिमंडळीय ५ यांचे पाहिजे व फरारी शोध पथक तयार करणेत आलेले आहे.

नमूद परिमंडळ ५ चे य पाहिजे व फरारी असलेले आरोपीचे शोध पथकांतील अंमलदार सर्फराज देशमुख व नासेर देशमुख यांना खात्रीदायक आणी विश्वासू बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे अभिलेखावर मागील ०१ वर्षाचे कालावधी पासून हडपसर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ७६४/२०२२ मा.वि.क. ३०७, ३२३, ५०४, ५०४.३४ मधील पाहिजे व फरारी असलेला आरोपी नामे साहील ऊर्फ चपटा अकबर शेख वय २३ वर्ष, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे हा सन २०२१-२२ मधील टॉप टेन गंभीर गुन्हयातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून हा वारवार रहाणेची ठिकाणे बदलुन पोलीसांना गुंगारा देत होता. त्यास नियोजनबध्द सापळा रचुन तो कोवा येथे सध्या रहात असलेल्या ठिकाणा वरुन ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी प्रभारी अधिकारी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिलेला आहे. तसेच हा मिळालेल्या दुसऱ्या कारवाईत देखील पुणे शहर पोलीस रेकॉर्डवरील वाहनचोरी/जबरी चोरी/घरफोडी इत्यादी एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला व एकुण ४ पोलीस स्टेशन-

१. हडपसर पोस्टे २. कोंढवा पोस्टे ३. सिंहगड पोस्टे ४. वारजे माळवाडी पोस्टे इ. तसेच वाहनचोरी व जबरी चोरीचे गुन्हयात पाहीजे फरारी असलेला सराईत आरोपी नामे गणेश मानसिंग पवार वद-२८ वर्ष, रा. सध्या स.नं.४६. टिळेकर नगर, कोंढवा बु. पुणे हा रहाते घरी येणार असल्याची माहीती पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख व नासेर देशमुख यांना खात्रीदायक आणी विश्वासू बातमीदारा मार्फत मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे सदर आरोपीस नियोजनबध्द सापळा रचून तो टिळेकर नगर, कोढवा येथून ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी तुर्त प्रभारी अधिकारी हडपसर पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिलेला असून इतर पोस्टे प्रभारी अधिकारी यांना पुढील कारवाई कामी कळविलेले आहे..

तसेच हातोहात मिळालेल्या तिसऱ्या कारवाईत वानवडी पोस्टे कडील गु. रजिन ३६०/२०२१ भादविक ४२०.४६८.४७१.३४ व दोन वर्षापासून पोलीसांना गुंगारा देवून स्वःताचे अस्थित्व लपवून वेगवगळे पेहराव करून न्यूज पॅनेलचा रिपोर्टर व कॅमेरामन असलेचे भासवून व गोरगरिब जनता यांना वनविभागचे सन २०१८ ते सन २०१९ पासुन जमिनीचे खोटी गुंठेवारी व खोटे दस्तऐवज बनवुन सदर जमिनीचे विक्री केले प्रकरणी व स्वःताचे रहाण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलत असलेला आरोपी नामे सुनिल मारुती साळवे – ३९ वर्ष हा पद्मावती मंदिराजवळ, उंड्री-पिसोळी, पुणे येथे येणार असल्याची माहीती पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख व नासेर देशमुख यांना खात्रीदायक आणी विश्वासू बातमीदारामार्फत मिळाल्याने त्या माहितीच्या आधारे सदर आरोपीस नियोजनबध्द सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी प्रभारी अधिकारी वानवडी पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिलेला आहे.

तसेच लागलीच हातोहात मिळालेल्या चौथ्या कारवाईत पोलीस अंमलदार आनंद पाटोळे व राजु कदम यांना खात्रीदायक आणी विश्वासू बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरून दोन वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारे व अपुर्ण नाव व पत्ता असलेले तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणे गु. रजि.नं. ३५५/२०२५ भा.द.वि.क. ३२४, ५०४, ५०६, ३४ मधील पाहिजे असलेले आरोपी नामे १. रोशन सुरेश घाडगे वय २१ वर्ष २. जगदिश सोमनाथ घाडगे वय २२ वर्ष, दोघे रा. मोरे वस्ती, माजरी फार्म जवळ, मांजरी, पुणे यांना नियोजनबध्द सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी प्रभारी अधिकारी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिलेला आहे. वरिल गंभीर गुन्हयातील पाचही आरोपी यांना परिमंडळ-५ यांचे कडील कार्यरत असलेल्या शोध पथकाने १२ तासात जेरबंद करून नमुद आरोपींना नमुद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहेत.तसेच लागलीच हातोहात मिळालेल्या चौथ्या कारवाईत पोलीस अंमलदार आनंद पाटोळे व राजु कदम यांना खात्रीदायक आणी विश्वासू बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरून दोन वर्षापासून पोलीसांना गुंगारा देणारे व अपुर्ण नाव व पत्ता असलेले तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणे गु. रजि.नं. ३५५/२०२५ भा.द.वि.क. ३२४, ५०४, ५०६, ३४ मधील पाहिजे असलेले आरोपी नामे १. रोशन सुरेश घाडगे वय २१ वर्ष २. जगदिश सोमनाथ घाडगे वय २२ वर्ष, दोघे रा. मोरे वस्ती, माजरी फार्म जवळ, मांजरी, पुणे यांना नियोजनबध्द सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई कामी प्रभारी अधिकारी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांच्या ताब्यात दिलेला आहे. वरिल गंभीर गुन्हयातील पाचही आरोपी यांना परिमंडळ-५ यांचे कडील कार्यरत असलेल्या शोध पथकाने १२ तासात जेरबंद करून नमुद आरोपींना नमुद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहेत.

परिमंडळ ५ शोध पथक पुणे शहर.

सदरची कारवाई ही मा. श्री. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक सो. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर. मा. श्री. रंजन कुमार शर्मा सो अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ०५ पुणे शहर यांच सुचना व मार्गदर्शनाखाली परिमंडळीय ४ पाहिजे व फरारी आरोपी शोध पथकाचे अंमलदार राजू कदम, अमित जाधव, आनंद पाटोळे, सर्फराज देशमुख, नासर देशमुख, जयदेव भोसले, ज्योतिष काळे यांनी वरील प्रमाण वरिल आरोपी हे १२ तासात जेरबंद केलेले आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *