कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण;फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील.प्रकार. PUNE.RTO
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
PUNE RTO (ACS NEWS) ONLINE PORTAL
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुणे :|आरटीओमध्ये छोटे जरी काम करायचे असेल तर एजंटाशिवाय होत नाही. जर एजंटाशिवाय गेले तर त्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात, असा सर्वसामान्यांना नेहमी अनुभव येत असतो. पण, एजंटाच्या भरवश्यावर सुरु असलेला कारभारामुळे आता एजंटच शिरजोर झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. एका एजंटने गाडीचे कागदपत्र आरटीओ निरीक्षकाच्या अंगावर फेकून मारहाण करुन जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८२/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निकी फ्रान्सीस स्वामीनाथन (वय ३८, रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रोड, फुलेनगर) याला अटक केली आहे. हा प्रकार फुलेनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी दुपारी १ ते ३ यावेळेत घडला . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात शासकीय कर्तव्यावर असताना.खाजगी एजंट स्वामीनाथन हा त्यांच्या कार्यालयात आला. फिर्यादी यांच्या अंगावर गाडीचे पेपर फेकले. ‘‘ए गायकवाड, हया पेपरवर सही करुन दे,’’ असे बोलून शिवीगाळ केली. तसेच ‘‘गायकवाड सही कर नाही तर मी तुला तुझ्या पत्त्यावर येऊन जीवे मारुन टाकील,’’असे बोलून फिर्यादीची गंचाडी पकडून मारहाण केली. अँटी करप्शनमध्ये अडकविण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या सहकार्यांना ‘‘आताचे आता रजिस्टरला नोंद कर, नाही तर मी तुला बघुन घेईल, ’’अशी धमकी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad