पत्रकार चे तसेच सीबीआय बनावट आयकार्डचा आधार खंडणी मागणार आरोपीला पोलिसांनी केली अटक.

हडपसर पोलीस स्टेशन ची कामगिरी दिनांक- १७ / ०९ / २०२१ पत्रकारितेचा तसेच सामाजिक संघटनेचा आणि बनावट आयकार्डचा आधार घेवून त्याआड खंडणी मागणा – या टोळीस हडपसर पोलीसांकडून अटक .

दिनांक- १४ /०९/ २०२१ रोजी इसम नामे दिलीप मानसिंग मेमाणे वय ३४ वर्षे धंदा भाजीविक्री रा . दादा जाधवराव हायस्कुल शेजारी जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे यांना इसम नामे अनिल जगन्नाथ बोटे वय ३४ वर्षे , रा . तुकाई दर्शन , हडपसर पुणे याने “ मी शिवप्रहार संघटना पुणे शहर अध्यक्ष असुन तुझ्याविरुध्द एक महिला बलात्काराची तक्रार घेवुन आमचेकडे आलेली आहे . तीला घेवुन आंम्ही लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला जाणार आहे . तु जर आम्हाला ५ लाख रुपये दिले नाही तर तुला मी बलात्काराच्या गुन्हयात अडकवुन टाकेन ” असे म्हणुन फिर्यादीकडुन खंडणीची मागणी केली त्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नंबर- ७५१/२०२१ भा.द.वि. कलम- ३८५.३८७.३८९ .३२३.५०४.५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . दाखल गुन्हयामध्ये अनिल बोटे यास सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी अटक केलेली होती . दाखल गुन्हयातील फिर्यादी दिलीप मेमाणे यांचेकडे गुन्ह्यासंदर्भाने त्यांना विश्वासात घेवून पुन्हा अधिक चौकशी करत असताना त्यांनी सांगीतले की , इसम नामे राहुल हरपळे , अनिल बोटे , स्वप्नील धोत्रे , शिवा खरात व मारुती निचीत यांनी सर्वांनी मिळुन मेगा सेंटर मगरपट्टा येथील ऑफिसमध्ये त्यांचेविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करु नका असे म्हणण्यास गेल्यावर त्यांनी सर्वांनी मिळुन फिर्यादीस ” तु ५ लाख रुपये नाहि दिले तर , तुझे काहि खर नाही , तुला पैसे द्यावेच लागतील ” असे म्हणुन शिवीगाळ व धमकी देवुन पुन्हा पैशांची मागणी केली व अनिल बोटे याने ऑफिसमधील खुर्चीने त्यांना मारहाण केली . तसेच मारुती निचीत याने त्याचे खिशातुन बनावट सीबीआय आयपीएस अधिकारीचे आयकार्ड दाखवुन “ तुला आमचे सर्वांचे ऐकावेच लागेल . तुला दुसरा पर्याय नाही ” असे म्हणुन पैशांची मागणी केली . राहुल हरपळे या व्यक्तीने मारुती निचीत यास तसेच आणखी ५ लोकांना अशाच प्रकारे पत्रकारीतेचे तसेच सीबीआय अधिकारीचे बनावट आयकार्ड बनवुन दिलेले आहे . तसेच तो स्वतः , महाराष्ट्राचा प्रहारचे वेब पोर्टलचा वापर करुन ऑनलाईन बातमी देत आहे . व त्याआड अशाच प्रकारे लोकांना खंडणी मागत आहेत . त्यावरुन दाखल गुन्हयामध्ये ४६४ , ४६५ , ४६८ , ४७१,१७०,१७१ प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे . सदर गुन्हयाचे तपासादरम्यान हडपसर पोलीस स्टेशनकडील हनुमंत गायकवाड सहा पोलीस निरीक्षक यांनी इसम नामे

१ ) राहुल मच्छीद्र हरपळे वय ३३ वर्षे रा . चंदवाडी जुन्या कॅनाल शेजारी फुरसुंगी पुणे .

२ ) संतोष ऊर्फ शिवा उत्तम खरात वय २६ वर्षे रा . कामठेमळा सम्राट गार्डन समोर लोहिया गार्डनमागे हडपसर पुणे . मुळगाव- मु.पो. वाकडी ता.राहता जि.अहमदनगर

३ ) स्वप्नील विजय धोत्रे वय २४ वर्षे रा . प्लॅट नंबर- ५०४ , छाया निवास शिवशंभोनगर व्हीआयआयटि कॉलेजच्या मागे पठाण चौक , कोंढवा पुणे . मुळगाव मु.पो.उत्तर जेवळी ता.उमरगा जि.उस्मानाबाद

४ ) मारुती लहु निचीत वय ३९ वर्षे रा . वडनेर खुर्द ता.शिरुर जि.पुणे .

यांचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने यांना अटक केलेली आहे .

या सर्वांनी अशाच प्रकारे आणखी लोकांना पत्रकार तसेच तोतया सीबीआय अधिकारी तसेच संघटनेचा पदाधिकारी असल्याची बतावणी करुन लोकांना घाबरवुन खंडणी मागितल्याची शक्यता आहे .

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली

मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री . बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर . पोनि . ( गुन्हे ) श्री . राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , गणेश क्षीरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदिप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव पोलीस शिपाई शाहिद शेख , प्रशांत दुधाळ , प्रशांत टोणपे , रियाज शेख , सुरज कुंभार , निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन , पुणे

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *