गिफ्ट देण्यासाठी ज्वेलरी च्या दुकानात केली चोरी,

ACS POLICE CRIME SQUAD

तपास पथकाचे पोलीस अमलदार शाहिद शेख, निखिल पवार, व प्रशांत दुधाळ,ची कामगिरी .

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी ज्वेलरी च्या दुकानात केली चोरी,
(२,५०,०००/,), लाखाचा मुद्देमाल जप्त,

रांका ज्वेलर्स हडपसर पुणे येथे मास्क लावून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी अंगठ्या दाखवण्यास सांगून दाखवलेल्या अंगठ्या पैकी 3 अंगठ्या निवडल्या त्याच दरम्यान दोन तरुण पैकी एक दुकानातून बाहेर गेला त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे, ठेवत असताना दुकानात असलेला, दुसऱ्या तरुणांने3 अंगठ्या घेऊन दुकानाचे बाहेर पळाला आधीच मोटारसायकल वर बसलेल्या आपल्या साथीदारांसह, भरघाव वेगाने निघून गेले त्या प्रकरणी हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
सदर प्रकरणाची हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला असता असे निष्पन्न झाले की त्याच दिवशी हडपसर येथील घटनेच्या पूर्वी पाच तरुणांनी ब्ल्यू स्टोन ज्वेलर्स कोथरूड पुणे या दुकानातून खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जाऊन अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या दाखविण्यास सांगून चोरून घेऊन पळून गेल्याचा गुन्हा अलंकार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता,
हडपसर तपास पथकाकडून करण्यात आलेल्या सी, सी,,टी ,व्ही, विश्लेषणातून, आणि तपास पथकाचे पोलीस अमलदार शाहिद शेख, निखिल पवार, व प्रशांत दुधाळ, यांना मिळालेल्या बातमी द्वारे हडपसर पोलिसांनी आरोपी नामे,

( 1)हनुमंत रोकडे (२३ )वर्ष राहणार राधा कुंज निवास महात्मा गांधी कॉलेज जवळ नागोबा नगर अहमदपूर लातूर

(,२), वैभव संजय जगताप (२२) वर्ष, रा,मु,पो, केवाड, केनवड ,तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेतले, नमूद दोन्ही तरुणांकडे तपास केला असता दोन्ही आरोपी हे पुण्यातील दोन जुन्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात बी, ए, एम, एस, व बी, एस, सी, नर्सिंग चे तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून ते व्यसनाधीन आहेत त्यांनी व्यसन चैनिकरता तसेच मैत्रिणीला गिफ्ट, देण्यासाठी वरील चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली आहे, त्यांच्या कडून गुन्ह्यात चोरी केलेल्या ३६ ग्रॅम ७७० मिली ग्रॅम वजनाच्या एकूण चार सोन्याच्या अंगठ्या तसेच गुन्हा करण्याकरिता वापरलेली युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण किं, रु,२,५०,०००/ चा मालं हस्तगत करण्यात आलेला आहे,


सदरची कामगिरी ही मा ,श्री, नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, व,मा, नम्रता पाटील पोलीस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सूचना व मार्गदर्शना खाली, मा, श्री, बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे, श्री अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोनी, (गुन्हे,) श्री राजू आडागळे, पोनि, (गुन्हे)श्री दिगंबर शिंदे, यांचे सूचना प्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, गणेश शिरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत काळे, सचिन जाधव, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, पकडताना निखिल पवार ,प्रशांत टोनपे, रियाज शेख सचिन गोरखे सुरज कुंभार यांचे पथकाने प्रशंसनीय, कामगिरी केली,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *