अवैधरित्या गॅसची चोरी करुन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई.

ACS POLICE CRIME SQUAD

पोलीस महाराष्ट्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय .

प्रेसनोट दिनांक १४/१२/२०२१ सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने अवैधरित्या गॅसची चोरी करुन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई केलेबाबत .

मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना

दिनांक १२/१२/२०२१ रोजी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी भरलेल्या गॅस टँकरमधुन बनावट तयार केलेल्या गॅस रिफिलींग कनेक्टर पाईपच्या सहाय्याने गॅसची चोरी करुन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या व दिनांक १४/१२/२०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गॅस एजन्सीमध्ये गॅस रिफिलींग करुन गॅसची चोरी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे . दिनांक १२/१२/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस शिपाई योगेश तिडके यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमुख श्री देवेंद्र चव्हाण यांचेसह टीम रवाना होवुन चाकण पोलीस स्टेशन हद्दीत जरे लॉन्स च्या समोर , गणराज गॅस एजन्सी च्या पाठीमागे , मोकळ्या जागेत , चाकण – शिक्रापूर रोड , रासे ता . खेड जि . पुणे येथे भरलेल्या गॅस टँकरमधुन LPG गॅसची चोरी करुन रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस कनेक्टरच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या इसमांवर दिनांक १२/१२/२०२१ रोजी रात्री ००:४५ वा चे सुमारास सापळा रचुन छापा टाकला असता सदर ठिकाणी

१ ) लाल पांढऱ्या रंगाचे NL 01 N 7105 क्रमांकाचे १४ चाकी

२ ) पांढऱ्या रंगाचे NL 01 N 7072 या क्रमांकाचे १४ चाकी गॅसने भरलेले दोन कॅप्सुल गॅस टँकर मधुन त्याचे ताब्यातील कमर्शियल गॅस सिलेंडर टाक्या मध्ये गॅस टँकर कॅप्सुलचे खालच्या बाजूस DANGER असे लिहलेल्या बॉक्सला त्यांचेकडे असलेले बनावट तयार केलेले गॅस कनेक्टर रिफीलींग ( पाईप ) जोडुन इण्डेन ऑईल कंपनीच्या कॅप्सुलच्या आकाराच्या दोन्ही गॅस टँकर मधुन एकाच वेळी ०६-०६ कमर्शियल गॅस सिलेंडर जोडुन कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणार नाही अशा पध्दतीने गॅस टँकरमधुन गॅस काढुन सिलेंडरमध्ये गॅस भरताना ०३ इसम जागेवर मिळुन आले . त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता वाहन चालक १ ) नरसींग दत्तु फड २ ) अमोल गोविंद मुंडे यांनी सांगितले की , ते ऊरण जि . रायगड येथुन गॅस टँकर भरुन इण्डेन ऑईल कंपनी , रासे ता . खेड जि . पुणे येथे कंपनीमध्ये गॅस टैंकर खाली करण्यासाठी येणार आहोत असे चालकांचे ओळखीचा इसम नामे राजु बबन चव्हाण रा . रासे ता . खेड यांचेसोबत फोनद्वारे संपर्क झाल्यानंतर त्याने टँकर घेऊन येण्याबाबत सांगितले . त्यानंतर वाहन चालकांनी इण्डेन ऑईल कंपनी , रासे ता . खेड जि . पुणे या कंपनीमध्ये गॅस कॅप्सुल टँकर खाली करण्यासाठी जाण्याचे जाणुन – बुजुन टाळुन जरे लॉन्स च्या समोर , गणराज गॅस एजन्सी च्या पाठीमागे , मोकळ्या जागेत , चाकण – शिक्रापूर रोड , रासे ता . खेड जि . पुणे येथे रात्रीच्या वेळी संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी गॅस चोरी करताना मिळुन आले . राजु बबन चव्हाण हा वाहन चालकांना त्या बदल्यात एका भरलेल्या गॅस सिलेंडर मागे प्रत्येकी ६०० / – रु देतो व त्यानंतर स्वतः कमर्शियल भरलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या काळ्याबाजारात दरापेक्षा कमी दराने प्रत्येकी १,६०० / – रु किंमतीमध्ये विक्री करतो असे समजले . त्यांच्या ताब्यातुन खालील मुद्देमाल जप्त केला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे . १ ) १,०८,८८,०२६ / – रु किं चे लाल पांढऱ्या रंगाचे NL 01 N 7105 क्रमांकाचे १४ चाकी व पांढऱ्या रंगाचे NL 01 N 7072 या क्रमांकाचे १४ चाकी गॅसने भरलेले दोन कॅप्सुल गॅस टँकर जु.वा.किं.अं. २ ) ७० , ११९ / रु किं च्या गॅसने भरलेल्या व रिकाम्या HP , इण्डेन , भारतगैस या कंपनीच्या ३० निळ्या रंगाच्या लोखंडी गोलाकार गॅस सिलेंडर टाक्या जु.वा. किं . अं .

३ ) २१,००० /

४ ) २१,००० / रु किं . चे ०३ गॅस रिफिलिंग कनेक्टर सोबत पाईप जोडलेले जु.वा.किं . अं . रु किं चे ०३ अॅण्ड्रॉईड मोबाईल जु.वा. किं.अं. असा एकुण १,१०,०५,१४५ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे

१ ) नरसींग दत्तु फड वय ३१ वर्षे रा . धसवाडी ता . अंबाजोगाई जि . बीड ( गॅस टैंकर चालक )

२ ) अमोल गोविंद मुंडे वय २८ वर्षे रा . वागदरवाडी ता . अंबेजोगाई जि . बिड ( गॅस टँकर चालक )

३ ) राजु बबन चव्हाण वय ५२ वर्षे रा . रासे ता . खेड जि . पुणे

( गॅस चोरी करुन काळ्याबाजारात विक्री करणारा इसम ) यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं १५२३/२०२१ भादंवि कलम ३७९ , ४०७ , ४११ , २८५ , ३४ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा सन १९५५ चे कलम ३७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . तीनही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे . तसेच आज दिनांक १४/१२/२०२१ रोजी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत बालाजी वाघे हा वंदना गॅस एजन्सी , पिंपळे निलख गांव , पुणे येथुन व त्याचा भाऊ धनराज वाघे हा गुरुप्रसाद गॅस एजन्सी औंध , पुणे येथुन हे दोघे गॅस डिलीव्हरी बॉय व इतर त्यांचे कामगार यांचेकडून भरलेले घरगुती वापराचे गॅस सिलेंडर विकत घेतात आणि कोकणे चौक येथील स्वतःचे आदित्य गॅस दुकानाच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमधील रुममध्ये आदित्य गॅस दुकानामधुन ग्राहकांना देण्यासाठी प्राप्त केलेल्या रिकाम्या गॅस टाक्यांमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडर मधुन रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये अंदाजे ०२ ते ०३ किलो गॅस भरुन गॅसची चोरी करतात आणि काळ्याबाजारात विक्री करीत आहे . अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत ० ९ : ०० वा चे सुमारास छापा टाकून त्यांना भरलेल्या गॅस सिलेंडर मधुन रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना रंगेहाथ पकडुन त्यांचे ताब्यातुन खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त केला त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे .

१ ) १,६०,०० / – रु किं चे MH 14 AZ 6064 व MH 14 AS 5720 या क्रमांकाचे दोन अॅटो . २ ) १,४१,००१ / – रु किं च्या घरगुती ६० व कमर्शियल ०२ अशा एकूण ६२ गॅस सिलेंडर टाक्या , ३ ) १३,४५० / – रु रोख रक्कम ४ ) ७,६०० / – रु किं चे इतर साहित्य . असा एकुण ३,२२,०५१ / – रु किं चा मुद्देमाल मिळुन आल्याने इसम नामे

१ ) धनराज मल्लप्पा वाघे वय २८ वर्षे रा . घर नंबर ३ , सुयोग कॉलनी , रहाटणी , पुणे ( गॅस रिफिलिंग करणारा इसम )

२ ) शुभम रघुनाथ गवळी वय २७ वर्षे रा . पवनानगर , रहाटणी , पुणे ( गॅस रिफिलिंग करणारा इसम )

३ ) काकासाहेब साहेबराव मिसाळ वय ४९ वर्षे रा . रुम नंबर २१० , बिल्डींग नंबर ४ , मोरया हौसींग सोसायटी , वेताळनगर , चिंचवड , पुणे ( ड्रायव्हर )

४ ) अतिश अंबादास कसबे वय २८ वर्षे रा . महादु नखाते यांची रुम , रहाटणी चौक , रहाटणी , पुणे ( ड्रायव्हर )

५ ) सुरेश राजकुमार म्हेत्रे वय २५ वर्षे रा . सुयोग कॉलनी , रहाटणी , पुणे ( टाकीचे वजन करणारा इसम ) यांना ताब्यात घेण्यात आले असुन वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे .

वरील दोन्ही कारवाईमध्ये एकुण १,१३ , २७ , १९६ / – रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) श्री . काकासाहेब डोळे , मा . सहा . पोलीस आयुक्त डॉ . श्री . प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण , सपोनि डॉ . अशोक डोंगरे , पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार योगेश तिडके , जालिंदर गारे , सचिन गोनटे , नितीन लोंढे , संतोष बर्गे , विजय कांबळे , भगवंता मुठे , अनिल महाजन , राजेश कोकाटे , गणेश कारोटे , वैष्णवी गावडे , अतुल लोखंडे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *