खडक पोलीस स्टेशन ची कामगिरी सोन्याची चैन गंठण चोरी करणारे आरोपीला अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – २६/०७/२०२१ खडक पोलीस स्टेशन देवदर्शनावरुन घरी जाणा – या महिलेच्या गळयातील सोनसाळखी जबरदस्तीने हिसकावून चोरुन पळुन जाणा – या चोरटयास अटक

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दिनांक ८/७/२०२१ रोजी दुपारी २/३० वा.चे सुमारास वृध्द महिला वय ८२ वर्षे रा . काची आळी रविवार पेठ पुणे हया शुक्रवार पेठ पुणे येथील जैन मंदीरात देवदर्शनासाठी जावुन परत सुभानशा दर्गा , भांडी आळी , धोबी तालीम काची आळी मार्गने घरी जात असतांना सोसायटी पहिल्या मजल्याचे जिन्यावर आले असतांना अज्ञात इसमाने त्यांचा पाठलाग करुन त्याचे गळयातील ३ तोळे वजनाची १,३५,००० / – रु किं ची सोन्याची चेन त्यामध्ये देवाचे पेन्डंल असे जबदरस्तीने हिसका मारुन चोरुन नेली होती त्याबाबत खडक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दाखल गुन्हयातील संशयीत आरोपीचा तांत्रीक बाबीच्या आधारे शोध घेत असतांना संशयीत इसमाचे शरीरावर पांढरे कोड असुन तो घाई घाई गडबडीमध्ये पायी चालत जाताना वेगवेगळया ठिकाणी दिसून आला . ते शरीरावरील पांढरे कोड हा तपास संदर्भात महत्वाचा धागा मिळाल्याने श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक व हर्षवर्धन गाडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) खडक पोलीस स्टेशन यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफला मार्गदर्शन केले . गुन्हयातील संशयीत वर्णनाचे इसमाचा शोध तपास पथकातील अधिकारी व पोलीस स्टाफ असे घेत असतांना करीत सहा पोलीस निरीक्षक सुशिल वि बोबडे , खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे चाणाक्ष नजरेतुन साखळी चोरणारा इसम हिराबाग एस.आर.ए शुक्रवार पेठ पुणे येथील स्नॅक्सचे दुकानाचे जवळ थांबला असल्याचे दिसल्याने ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेण्यात आले त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले (नाव अमोल विश्वनाथ शेरवाने )वय ३६ वर्षे धंदा . काहीनाही , रा . फ्लॅट नं ५ , चंद्रभाग अपार्टमेंन्ट , भेंडी चौक , विठ्ठल मंदीराजवळ , आंबेगाव , पुणे

असे असल्याचे सांगुन त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडे पोलीस रिमांड मध्ये असतांना सखोल तपास करता त्याचे राहते घरातुन वरील वर्णनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ.संजय शिंदे , मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ डॉ.प्रियंका नारनवरे , मा.सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री . सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , सुशिल बोबडे , सहा पोलीस निरीक्षक , राहुल खंडाळे , विक्रम मिसाळ , राहुल घाडगे पोलीस उप निरीक्षक व पोलीस स्टाफ पोहवा फहिम सैय्यद , संदिप पाटील , अनिकेत बाबर , रवी लोंखडे , पोलीस अंमलदार समीर माळवदकर , बंटी कांबळे , राहुल मोरे , हिम्मत होळकर , कल्याण बोराडे , विशाल जाधव , किरण शितोळे , तेजस पांडे , दिनेश खरात यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *