कोंढवा येथील हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – २६/०७/२०२१ सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर कोंढवा येथील हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दि .२५.०७.२०२१ रोजी मा.वरिष्ठांकडुन गोपनीय माहीती प्राप्त झाली की , हॉटेल क्लब २४ , दोराबजी , महंमदवाडी , पुणे येथे अवैद्यरित्या हुक्का बार चालु असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने , सदर गोपनीय बातमीची खातरजमा करण्याकरीता श्रीमती.शिल्पा चव्हाण , पोलीस निरीक्षक , सामाजिक सुरक्षा विभाग , दरोडा व वोहन चोरी विरोधी पथक -१ , अंमली पदार्थ विरोधी पथक -२ गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री.खांडेकर पोलीस स्टाफ असे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांची विविध पथके स्थापन करुन

सदर हॉटेलचा मालक (अमर खंडेराव लटुरे , रा . महंमदवाडी , पुणे) व हॉटेल मॅनेजर( विक्रम सुखदेव जाधव , वय -३० वर्षे , रा.महंमदवाडी , पुणे )यांचेकरवी सदर हॉटेल मध्ये बेकायदेशीर पणे हुक्का बार चालवुन ग्राहकांना हुक्का सेवन करण्याकरीता पुरवीत असताना मिळुन आले .

त्यांनी कोवीड -१९ विषाणु संसर्गाचे उल्लंघन केल्याने वरील हॉटेल चालक व मॅनेजर यांचे विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( महाराष्ट्र सुधारणा ) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ , २१ अ , तसेच भादवि कलम १८८,२६९ , २७० तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम २००५ चे कलम ७ ( २ ) , २० ( २ ) अन्वये

कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून , महमदवाडी येथील अवैद्य रित्या २४ क्लब , ०४ हुक्का पार्लर हे सील करून ०४ चिलीम आणि इतर साहित्य असा एकुण ३५,६०० / – रू किचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे .

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह – आयुक्त , .रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप – आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहरयांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री.खांडेकर अंमली पदार्थ विरोधी पथक -२ , गुन्हे शाखा , पुणे शहर व पोलीस अंमलदार यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331525

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *