हातात तलवार घेवुन सोशल मिडीयावर दहशत निर्माण करणारा आरोपी गजाआड.

ACS POLICE CRIME SQUAD

युनिट १ गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमोल पवार ची कामगिरी .

दिनांक – ०९ /१२/२०२१ युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर हातात तलवार घेवुन सोशल मिडीयावर दहशत निर्माण करणारा आरोपी गजाआड.

मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचे मार्गदर्शनानुसार पोउपनि.संजय गायकवाड व स्टाफ असे खाजगी दुचाकी वाहनाने खडक पोलीस ठाणेचे हद्यीत पेट्रोलींग करीत असताना , पोलीस अंमलदार अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , महर्षीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळ सार्वजनिक रोडवर ग्रे रंगाचा शर्ट घातलेला व निळया रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला एक मुलगा उभा असून त्याच्याकडे घातक शस्त्र आहेत , व तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत आहे . अशी बातमी मिळाल्याने मा . वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे युनिट -१ , गुन्हे शाखा यांचे सुचनेनुसार बातमीचे ठिकाणी मिळालेल्या बातमीतील वर्णनानुसार एक मुलगा संशयास्पदरित्या उभा असलेला दिसून आला त्यास पोलीस असले बाबतची चाहुल लागु न देता अचानकपणे ताब्यात घेतले . त्यास आहे त्या स्थितीत थांबण्यास सांगून त्यास पोलीस असले बाबत ओळख देवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले

नाव राहूल ऊर्फ ऋतीक चंद्रकांत जगताप वय २१ वर्षे रा . सनं ४० / ३२३ झांमरे पॅलेस महर्षीनगर स्वारगेट पुणे

असे असल्याचे सांगितले . त्यास या ठिकाणी का थांबला आहे . अशी विचारणा करता तो समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थ ठरला व भेदरल्या सरखा वाटला म्हणून त्याची पंचासमक्ष झडती घेता त्यांने आपले अंगात घातलेल्या टी शर्टाचे आत पाठीमागे लपवुन किंमत रुपये १००० / – रू किची तलवार मिळुन आली . तसेच त्याने सदरची तलवार हातात घेवुन फोटो काढून तो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे . सदर बाबत पोलीस अंमलदार इमरान शेख यांनी फिर्याद दिलेवरुन स्वारगेट पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक – २१३/२०२१ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . –

सदरची कामगिरी सदरची कामगिरी मा . श्री अभिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा.श्री डॉ . रविंद्र शिसवे सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , मा . श्री रामनाथ पोकळे- अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , मा . श्री श्रीनिवास घाडगे – पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे शहर , मा . श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर यांच्या मार्गदर्शना खाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे , पोउप – नि संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अमोल पवार , सतीश भालेकर , महेश बामगुडे , इम्रान शेख , आय्याज दड्डीकर , तुषार माळवदकर , मिना पिंजण यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *