समर्थ पोलिस स्टेशन ची कामगिरी
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक – २ ९ / ०७ / २०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर सीसीटीव्ही कॅमे – याचे मदतीने प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली दागिन्यांची बॅग ०३ तासात रिक्षाचालकाचा शोध घेवून केली परत
ONLINE PORTAL NEWS
दिनांक -२८ / ०७ / २०२१ रोजी दुपारी ०३.०० वा . चे सुमारास एक महिला वडगाव धायरी येथून रिक्षाने राजेवाडी नानापेठ पुणे येथे आल्या . रिक्षातून उतरल्यानंतर त्यांचेजवळ असणारी त्यांची बॅग न कळत रिक्षामध्येच विसरुन राहिली . त्या घरी गेल्यानंतर त्यांना त्यांचेजवळ असणारी बॅग रिक्षामध्ये विसरली असल्याचे लक्षात आहे . तो पर्यंत त्यांनी प्रवास केलेली रिक्षा निघून गेला होती . यांना रिक्षाचा आरटीओ क्रमांक देखील माहिती नसल्याने त्या घाबरलेल्या अवस्थेत संत कबीर पेलीस चौकी येथे गेल्या . तेथे पोलीस उपनिरीक्षक हाळे यांनी रिक्षाचा आरटीओ क्रमांक तक्रारदार यांस माहित नसल्याने व बॅग गेल्याने तांत्रीक पध्दतीने तपास करण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशन येथे घेवून गेले . समर्थ पोलीस स्टेशन पुणे येथे दिवसपाळीचे अधिकारी महिला सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना वाघमारे यांनी यांचेकडे सविस्तर चौकशी केली असता , यांनी त्यांची बॅग वडगाव धायरी येथून राजेवाडी पुणे येथे आल्यानंतर उतरताना चुकून राहिलेली असल्याचे व बॅगमध्ये त्यांचा सोन्याचा ०१ तोळ्याचा गंठण , चांदीचे पैजन , बँकेचे चेक बुक तसेच पासबुक असल्याचे सांगितले . तेंव्हा पोलीस उपनिरीक्षक हाळे यांनी तात्काळ समर्थ पोलीस ठाणेकडील तपासपथकाचे कर्मचारी पोलीस शिपाई श्याम सुर्यवंशी , पोलीस शिपाई विठ्ठल चोरमले यांना त्यांनी प्रवास केलेल्या परिसरात तांत्रीक तपास केला असता यांनी अॅटो रिक्षा क्रमांक – एम.एच .१२ एफ.झेड .६५१० याने प्रवास केला असल्याचे निष्पन्न झाले . त्यानंतर सदर रिक्षाचालकाचा नाव पत्ता व माहिती प्राप्त केली असता सदर रिक्षा हा इसम नाम- आकाश राजेंद्र शेलार राहणार- वडगाव धायरी , पुणे यांचे नावे असल्याची माहिती प्राप्त झाली . त्यानंतर पोलीसांनी लागलीच सदर इसमाकडे संपर्क केला . या दरम्यान सदर रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवून सदरची बॅग परत करणेसाठी सिंहगड पोलीस स्टेशन पुणे येथे जात असल्याचे त्याने सांगितले त्यास पोशि विठ्ठल चोरमले यांनी समर्थ पोलीस स्टेशन येथे येण्यास सांगितले . रिक्षाचालक नामे आकाश शेलार हे समर्थ पो.स्टे . येथे परत आल्यानंतर त्यांचे रिक्षातील बॅग मौल्यवान दागिने असे एकुण ५० हजार रुपये पेक्षा जास्त किंमतीचा चिजवस्तू पोलीसांचे मदतीने तक्रारदार यांना अवघ्या ०३ तासामध्ये परत मिळवुन दिलेली आहे . यामुळे तक्रारदार श्रीमती डोके यांनी पोलीस व प्रामाणिक रिक्षाचालकाचे आभार मानले आहे .
सदरची कामगिरी ही श्री . विष्णू ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पो.स्टे . पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना वाघमारे , पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे , पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते , पोलीस हवालदार सुशिल लोणकर , पोलीस हवालदार संतोष काळे , पोलीस नाईक सुभाष पिंगळे , पोलीस शिपाई श्याम सुर्यवंशी , पोलीस शिपाई विठ्ठल चोरमले , पोलीस शिपाई सुभाष मोरे , पोलीस शिपाई निलेश साबळे , पोलीस शिपाई सुमित खुट्टे , पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांनी केलेली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008